धुळे- दलित साहित्याने साहित्यविश्व समृद्ध केले आहे. या साहित्यातून दलितांचे जीवन मांडले गेले, हे साहित्य माणसाला विचार करायला भाग पाडते, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत कॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे उद्गाटन करण्यात आले.
पारंपरिक साहित्याला छेद देण्याचे काम दलित साहित्याने केले, आणि नव्या दमाचे साहित्य निर्माण होऊ लागले, आजवर दलित साहित्याने मोठी क्रांती केली आहे, असे साहित्य संमलेनाचे अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात म्हणाले.
शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात १०व्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. साहित्य संमलेनाचे मान्यवरांच्या हस्ते डफ वाजवून करण्यात आले. साहित्य संमलेनाच्या विचारमंचाला कॉम्रेड शरद पाटील यांचे नाव देण्यात आले आहे.
या साहित्य संमलेनाचे शनिवारी उदघाटन झाले. यावेळी जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, कॉ.भालचंद्र कांगो, आदी मान्यवरांसह साहित्य रसिक उपस्थित होते. २ दिवस चालणाऱ्या या साहित्य संमलेनात रसिकांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे.