ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यात 19 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या 410

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून गेल्या 2 दिवसात 32 रुग्णांची भर पडली आहे. आज 32 नव्या कोरोना संशयित्यांचा स्वॅब नमुना अहवाल प्राप्त झाला. त्यातील 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 14, 2020, 10:27 PM IST

धुळे- जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात 32 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज 32 नव्या कोरोना संशयित्यांचा स्वॅब नमुना अहवाल प्राप्त झाला. त्यातील 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या 410 झाली आहे. आतापर्यंत 209 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे.

410 कोरोनाबाधितांमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा, धुळे तालुक्यातील फागणे, या गावांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण असून जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी ठरली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 209 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 165 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील मृत्युदर वाढला असून तो 10 टक्क्यांवर गेला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये देखील वाढ झाली असून शहरात सध्या 89 कंटेन्मेंट झोन आहेत.

प्रशासनाने ताळेबंदीत शिथिलता आणल्याने नागरिकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. तसेच नागरिकांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.