ETV Bharat / state

धुळे कोरोना अपडेट : बाधितांना दिले जातायेत व्यायामाचे धडे

रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम खूप गरजेचे आहे. यामुुुुळे व्यायाम करण्यासाठी हे सर्वच रुग्ण उत्साहाने सहभागी होत आहेत.

corona patient learning yoga dhule
बाधितांना दिले जातायेत व्यायामाचे धडे
author img

By

Published : Jun 5, 2020, 9:42 PM IST

धुळे - जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधितांना व्यायामाचे धडे दिले जात आहे. यामुळे कोरोना कक्षामध्ये दिलासादायक चित्र दिसून येत आहे.

रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम खूप गरजेचे आहे. यामुुुुळे व्यायाम करण्यासाठी हे सर्वच रुग्ण उत्साहाने सहभागी होत आहेत. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढून सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, या दृष्टिकोनातून व्यायाम प्रकार या रुग्णालयात रुग्ण करीत आहेत. यासोबत डॉ. विशाल पाटील या रुग्णांना धिर देत त्यांचा उत्साह वाढवण्याचे काम करत आहेत.
या कक्षात उपचार घेत असलेले रुग्ण हे ठराविक वेळी योगासने आणि व्यायाम करीत आहेत. विशेष म्हणजे, औषधोपचार सोबत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी हे रुग्ण दिवसातून ठराविक वेळेस प्राणायाम आणि काही ठराविक आसन करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.