ETV Bharat / state

धुळ्यात कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू, जिल्ह्यात खळबळ - corona update dhule district news

साक्री येथील कोरोना संशयित ५३ वर्षीय व्यक्तीला ८ एप्रिल रोजी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. परंतु, त्यांचा आज पहाटे दीड वाजता मृत्यू झाला. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आहे.

Corona infected dies in dhule
धुळ्यात कोरोना बाधित इसमाचा मृत्यू, जिल्ह्यात खळबळ
author img

By

Published : Apr 10, 2020, 11:29 PM IST

धुळे - जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या मते, मृत झालेला कोरोनाग्रस्त रुग्ण साक्री येथील होता.

साक्री येथील कोरोना संशयित ५३ वर्षीय व्यक्तीला ८ एप्रिल रोजी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. परंतु, त्यांचा आज पहाटे दीड वाजता मृत्यू झाला. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आहे.

डाॅ.आर.आय.सुर्यवंशी

तसेच मालेगाव येथील एक महिला रुग्ण ९ एप्रिल रोजी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विलगीकरण कक्षात दाखल असून तिचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती या रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी डाॅ.आर.आय.सुर्यवंशी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.