ETV Bharat / state

गव्हरमेंट सर्व्हंट बँकेत दोन कोटींचा घोटाळा; चेअरमन, सीईओसह चौघांवर गुन्हा दाखल - गव्हरमेंट सर्व्हंट बँक घोटाळा

शहरातील गव्हरमेंट सर्व्हंट बँकेच्या तत्कालीन चेअरमन, सीईओसह चौघांनी ग्रुप विम्याची बनावट कागदपत्रे तयार करून दोन कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.

dhule police
धुळे पोलीस
author img

By

Published : Oct 30, 2020, 4:19 PM IST

धुळे - शहरातील गव्हरमेंट सर्व्हंट बँकेच्या तत्कालीन चेअरमन, सीईओसह चौघांनी ग्रुप विम्याची बनावट कागदपत्रे तयार करून दोन कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रवीण विक्रम बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गव्हरमेंट सर्व्हंट बँकेत दोन कोटींचा घोटाळा

धुळे शहरातील गव्हरमेंट सर्व्हंट बँकच्या तत्कालीन चेअरमन, सीईओसह चौघांनी ग्रुप विम्याची बनावट कागदपत्र तयार करून दोन कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य शाखा अधिकारी प्रवीण विक्रम बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फेडरल फायनान्शियल कन्सल्टंट कंपनीचा डायरेक्टर वसंत सिताराम निकम, कल्पेश जोशी, ग स बँकेचे तत्कालीन सीईओ रमेश यशवंत पवार आणि तत्कालीन चेअरमन यांनी 2012 ते 2014 या काळात ग्रूप विम्याचे बनावट कागदपत्रे तयार करून दोन कोटींचा गफला केला आहे.

चौघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल

1 जून 2011 ते 31 मे 2012 या कालावधीकरिता बजाज विमा कंपनीकडून चार आरोपींनी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा ग्रुप विमा संदीप विजय हरदळे यांच्याकडून काढला होता. हा ग्रुप विमा पॉलिसीचे वैध कालावधीनंतर नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यानंतर चार आरोपींनी 2012 - 13 तसे 2013- 14 या दोन वर्षात बजाज अलायन्स कंपनीचा लोगो मुळ कागदपत्रांचे बनावटीकरण करून जुन्या विमा पॉलिसीवरील सही कॉपी-पेस्ट केली. त्याआधारे त्यांनी खोटे बनावट दस्तऐवज तयार केले. या बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांनी फेडरल फायनान्शिअल कंपनीसाठी ग्रुप विमा काढण्यात आला. या कंपनीत केवळ बारा व्यक्ती काम करत असताना 3 हजार 696 कर्मचारी कार्यरत असल्याची खोटी माहिती दाखवून विमा पॉलिसी काढली.

आरोपींनी बँकेचे सभासद हे फेडरलचे कर्मचारी असल्याचे खोटे दाखवून सुमारे 2 कोटी रुपये रकमेची बनावट पॉलिसी काढली. त्याबदल्यात 20 लाख रुपये कमिशनही त्यांनी घेतले, सुमारे 2 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी या चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.