धुळे: कमी पगार, कर्जबाजारीपणामुळे साक्रीच्या ५४ वर्षीय बस कंडक्टर ची पुलाच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या.साक्री जवळील बायपास रोडवरील पुलाच्या अँगलला बस कंडक्टर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. नातेवाईकांनी त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत बस कंडक्टर काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे रजेवर होते अशी माहिती एसटीच्या साक्री येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली.
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एसटी महामंडळाच्या साक्री डेपोचे ५४ वर्षीय बस कंडक्टर हिरामण रुपचंद पवार, (राहणार रामदेवजी बाबानगर, साक्री ) हे ६ सप्टेंबर पासून बेपत्ता होते, पवार यांचे कुटुंबीय,नातेवाईक, मित्र परिवार शोध घेत असतांना ८ सप्टेंबर च्या सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान साक्री जवळील बायपास रोडवरील पुलाच्या अँगलला बस कंडक्टर हिरामण रुपचंद पवार हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
नातेवाईकांनी त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची साक्री पोलिसात अकस्मात मृत्यू अन्वये नोंद झालीय. मयत हिरामण पवार यांच्या सुसाईड नोट मध्ये कमी पगार, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मयत हिरामण पवार काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे रजेवर होते अशी माहिती एसटीच्या साक्री येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. पुढील तपास साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एम रायते हे करीत आहेत .