ETV Bharat / state

राज्यात भाजपचे सरकार येणार, एमआयएम आमदाराचा दावा

राष्ट्रपती राजवट जास्त दिवस न राहता लवकरच भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे आमदार फारुख शहा व्यक्त केला आहे. एमआयएम कोणत्याही युती अथवा आघाडीत जाणार नसून, पक्षाची भूमिका कायम विरोधकाची असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचा एमआयएम आमदाराचा दावा
author img

By

Published : Nov 13, 2019, 5:48 PM IST

धुळे - राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट जास्त दिवस न राहता लवकरच भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी व्यक्त केला आहे. सत्ता स्थापनेसाठी चालू असलेल्या घडामोडींसंदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी भाजपबद्दल मत मांडले.

राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचा एमआयएम आमदाराचा दावा

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही अद्याप राज्यात सत्तेचा तिढा न सुटल्यानेअखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर आमदार फारुख शहा यांनी राष्ट्रपती राजवट फार दिवस न राहता लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येण्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. तसेच शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी या नवीन आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास ते अस्थिर असेल, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात गेल्याबद्दल ओवैसींविरुद्ध तक्रार दाखल..

हे सरकार 3 ते 4 महिन्यातच पायउतार होऊन पुन्हा मध्यावधी निवडणुका लागतील, असे मत शहा यांनी व्यक्त केले. असे झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीला कोणीही मतदान करणार नाही, असे ते म्हणाले.

एमआयएम कोणत्याही युती अथवा आघाडीत जाणार नसून, पक्षाची भूमिका कायम विरोधकाची असल्याचे आमदार शहा यांनी सांगितले.

Intro:राज्यामध्ये लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही फार दिवस न राहता लवकरच भाजपचं सरकार स्थापन होईल, असा विश्वास धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे एमआयएम पक्षाचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.

Body:विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होऊन पंधरा दिवस उलटून देखील अद्याप राज्यांमध्ये सरकार स्थापन न झाल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या राष्ट्रपती राजवट नंतर धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांच्याशी ई टीव्ही भारतने संवाद साधला असता लागू झालेल राष्ट्रपती राजवट हे फार दिवस न राहता लवकरच भाजपचं सरकार स्थापन होईल तसेच शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास ते अस्थिर सरकार असेल हे सरकार 3 ते 4 महिन्यातच पायउतार होईल तसेच पुन्हा मध्यावधी निवडणुका लागल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांना कोणीही मतदान करणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.