ETV Bharat / state

Mass Suicide Attempt Dhule : धुळ्यात कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; सर्वांची प्रकृती चिंताजनक - Attempted mass suicide of family in Dhule

धुळे तालुक्यातील अवधान गावातील दौलत नगरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ( Family Attempt to Suicide in Dhule ) केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. 21) सायंकाळी घडली. यात अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष प्राशनातून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ( Dhule Medical Collage ) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mass Suicide Attempt Dhule
धुळ्यात कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Feb 22, 2022, 12:44 PM IST

धुळे - धुळे तालुक्यातील अवधान गावातील दौलत नगरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ( Family Attempt to Suicide in Dhule ) केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. 21) सायंकाळी घडली. यात अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष प्राशनातून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Dhule Medical Collage) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mass Suicide Attempt Dhule
धुळ्यात कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

कुटुंबियांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न -

धुळे (Dhule) तालुक्यातील अवधान गावातील दौलत नगरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांसह अन्य एक अशा पाच जणांनी एकाच वेळी विष प्राशन करून सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळी गणेश गोपाळ याच्यासह पत्नी सविता (वय ३५), मुलगी जयश्री (वय १४), मुलगा गणेश (वय १२) आणि भरत पारधी (वय २४) यांनी घरी विष प्राशन केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पाचही चार जणांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कौटुंबिक कलह -

हे कुटुंबीय शिरपूर (Shirpur) तालुक्यातील असून अवधान येथील दौलतनगरात गेल्या काही दिवसांपूर्वीच भाड्याचे घर घेऊन राहत होते. या पाचही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे या कुटुंबीयांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र पती- पत्नीचा प्रेम विवाह व त्यातून होणाऱ्या कलहातून या पाचही जणांनी विष प्राशन केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा - Road Accident : उत्तराखंडमध्ये चारचाकी दरीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.