धुळे - महात्मा गांधी हे मुस्लिमांची स्तुती करत असत त्यामुळेच त्यांची नथुराम गोडसे ने त्यांची हत्या केली असे वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी धुळ्यात केले. एमआयएमचे धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार फारुख शहा यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
एमआयएमचे धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार फारुख शहा यांच्या प्रचारार्थ ओवेसी यांची सभा पार पडली. यावेळी बोलतांना ओवेसी म्हणाले, महात्मा गांधी हे मुस्लिमांची स्तुती करत असत त्यामुळेच नथुराम गोडसे ने त्यांची हत्या केली. काँग्रेसची अवस्था अशी झाली की, बुडणाऱ्या जहाजातील कॅप्टन अगोदर त्या जहाजातील प्रवाशांचे जीव वाचवतो नंतर शेवटी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, काँग्रेसच्या या बुडत असलेल्या जहाजातील कॅप्टनच सगळ्यात आधी जहाजातून पळून गेला आहे.
हेही वाचा - धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात; जयकुमार रावल यांची डोकेदुखी वाढणार
नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या नावाने सुरू असलेली ड्रामेबाजी बंद करावी अशी टीका यावेळी ओवेसी यांनी यावेळी केली. दरम्यान, ओवेसींच्या या सभेत काहींनी हुल्लडबाजी केली. हा प्रकार सुरू असताना हुल्लडबाजी करणाऱ्यांना स्टेजवर उपस्थित असलेल्या लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तर, पोलिसांनीही या हुल्लडबाजी करणाऱ्यांना रोखले नाही. उलट प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पोलीस पथकातील काही कमांडोजने धक्काबुक्की केली. या सर्व प्रकाराबाबत आयोजकांमार्फत देखील खेद व्यक्त न झाल्याने पत्रकारांनी संताप व्यक्त केला. काशीराम पावरांच्या भाजप प्रवेशाने कार्यकर्ते नाराज, शिरपूरमधून जितेंद्र ठाकूरांच्या उमेदवारीसाठी आग्रह