ETV Bharat / state

धुळे : बालकांमधील चित्रकला वृद्धिंगत करणारा कलाकार - dhule Sameer Sheikh latest news

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या शहरात विविध कलाक्षेत्रात विद्यार्थी जात असतात. या विद्यार्थ्यांना अपयशाचा सामना करावा लागू नये, यासाठी शहरातील सुप्रसिद्ध चित्रकार समीर शेख हे गेल्या 21 वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. गेल्या 21 वर्षांपासून लहान मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण ते देत आहेत.

धुळे
धुळे
author img

By

Published : Nov 14, 2020, 3:34 PM IST

धुळे - शहरातील सुप्रसिद्ध चित्रकार समीर शेख हे गेल्या 21 वर्षांपासून लहान मुलांसाठी चित्रकलेचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. मुलांमधील चित्रकलेची आवड वृद्धिंगत व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. कालबाह्य होत असलेली चित्रकला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित व्हावी यासाठी समीर शेख यांचे प्रयत्न सुरू आहेत.

लहान मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण देताय सुप्रसिद्ध चित्रकार समीर शेख

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या शहरात विविध कलाक्षेत्रात विद्यार्थी जात असतात. या विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. धुळे शहरातील समीर शेख हे उत्तर महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार असून गेल्या 21 वर्षांपासून ते लहान मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत.

चित्रकलेशी संबंधित विविध ज्ञानशाखांना विद्यार्थी प्रवेश घेत असतात. मात्र, कुठलीही पूर्वतयारी नसल्याने या विद्यार्थ्यांना अपयशाचा सामना करावा लागतो. या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी समीर शेख हे लहान मुलांसाठी अत्यंत माफक दरात चित्रकलेचे प्रशिक्षण देतात. समीर शेख यांनी आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यातून अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून हे विद्यार्थी विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

चित्रकलेला वाव मिळावा यासाठी प्रयत्न -

दिवसेंदिवस कालबाह्य होत चाललेली चित्रकला पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच लहान मुलांमधील कल्पनाशक्तीला वाव मिळावा यासाठी समीर शेख यांनी धुळे शहरात प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. रंग आणि कुंचल्याच्या सहाय्याने विद्यार्थी आकर्षक चित्र रेखाटतात. हे विद्यार्थी मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीपुढे आदर्श निर्माण करीत आहेत.

विद्यार्थी आणि पालकांचा लाभतोय उत्तम प्रतिसाद -

धुळे शहरासह उत्तर महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी आणि पालकांचा समीर शेख यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील नामवंत चित्रकारांनी आणि कलाकारांनी समीर शेख यांच्या प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आहे.

हेही वाचा - भरधाव चारचाकी उड्डाणपुलावरून कोसळली... दोघांचा मृत्यू, तर 3 अत्यवस्थ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.