ETV Bharat / state

अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत होणार अधिकृत प्रवेश - mahavikas aghadi

तब्बल ३ टर्म धुळे शहराचे आमदार असलेले अनिल गोटे हे गुरुवारी शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.

anil gote
अनिल गोटे
author img

By

Published : Dec 12, 2019, 9:45 AM IST

धुळे - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्याचे परिणाम धुळे जिल्ह्याच्या राजकारणावर होणार आहे. माजी आमदार अनिल गोटे हे गुरुवारी शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विविध समीकरणामुळे अनिल गोटे यांचा काही मतांनी पराभव झाला. त्यामुळे तब्बल ३ टर्म धुळे शहराचे आमदार असलेले अनिल गोटे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. धुळे शहर विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधी हवा अशी मागणी आजही कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश करून विधान परिषदेच्या मार्ग सुकर होऊ शकतो, हे लक्षात घेत गोटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा. दरम्यान शहरात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीकडेही सक्षम नेतृत्व नाही. गोटे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीला पुन्हा नवीन उत्साह मिळून त्याचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकींसाठी होऊ शकतो.

हेही वाचा - धुळे: विजेचा धक्का लागून चार वर्षीय बालकाचा मृत्यू

गोटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे धुळे जिल्ह्याचे राजकीय समीकरण निश्चितच बदलणार आहे. त्यांच्या राजकीय कौशल्याचा फायदा महाविकास आघाडीच्या सरकारला निश्चितच होऊ शकतो. भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी गोटे यांची क्षमता लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन निती आखत अनिल गोटेंचा समावेश केला असावा, त्यांना विधान परिषदेवर घेऊन आमदार केले जाणार असल्याचीही चर्चा आहे. तसे झाले तर पुन्हा भाजपला धूळ चारण्यासाठी गोटे सज्ज होऊ शकतात.

हेही वाचा - उन्नाव बलात्कार प्रकरण : आरोपींवर कठोर कारवाई करा, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा कँडल मार्च

Intro:राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्याचे परिणाम धुळे जिल्ह्याच्या राजकारणावर होणार असून माजी आमदार अनिल गोटे हे गुरुवारी शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.Body:यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विविध समीकरणामुळे अनिल गोटे यांच्या काही मतांनी पराभव झाला. त्यामुळे तब्बल तीन टर्म धुळे शहराचे आमदार असलेले अनिल गोटे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. धुळे शहर विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधी हवा अशी मागणी आजही कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश करून विधान परिषदेच्या मार्ग सुकर होऊ शकतो हे लक्षात घेत अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा. दरम्यान शहरात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीकडे ही सक्षम नेतृत्व नाही. अनिल गोटे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीला पुन्हा नवीन उत्साह मिळून त्याचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी होऊ शकतो. अनिल गोटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे धुळे जिल्ह्याचे राजकीय समीकरण निश्चितच बदलणार आहे.Conclusion:अनिल गोटे यांच्या राजकीय कौशल्याचा फायदा महा विकास आघाडीच्या सरकारला निश्चितच होऊ शकतो. भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी अनिल गोटे यांची क्षमता लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवीन नीती आखत अनिल गोटेंचा समावेश केला असावा. त्यांना विधानसभेवर घेऊन आमदार केले जाणार असल्याचीही चर्चा आहे. तसे झाले तर पुन्हा भाजपला धूळ चारण्यासाठी अनिल गोटे सज्ज होऊ शकतात. किंबहुना राज्यसभेवर एखादे मंत्रिपद बहाल केले जाऊ शकते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.