ETV Bharat / state

खडसेंना डावलल्यामुळे भाजपवर हास्यास्पद वेळ - अनिल गोटे

भाजपात नव्याने भरणा झालेले व जुन्या नेतृत्वास म्हणजेच एकनाथ खडसे यांना पक्षाने डावलल्याने भाजपवर हास्यास्पद परिस्थिती उद्भवली आहे, अशा आशयाचे पत्रक प्रकाशित करत अनिल गोटे यांनी भाजपवर मिश्किल टीका केली आहे.

माजी आ. अनिल गोटे
author img

By

Published : Nov 4, 2019, 6:11 PM IST

Updated : Nov 4, 2019, 7:40 PM IST

धुळे - भाजपमध्ये नव्याने भरणा झालेले व जुन्या नेतृत्वास म्हणजेच एकनाथ खडसे यांना पक्षाने डावलल्याने भाजपवर हास्यास्पद परिस्थिती उद्भवली आहे, अशा आशयाचे पत्रक प्रकाशित करत अनिल गोटे यांनी भाजपवर मिश्किल टीका केली आहे.

भाजप-सेनेच्या सत्ता स्थापनेदरम्यान मुख्यमंत्री पदावरून चाललेल्या रसीखेचीमध्ये पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी फेर निवडणुकांबद्दल केलेल्या वक्तव्यास धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून उत्तर दिले आहे.

हेही वाचा - मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा; भाजप कार्यकर्त्यांना रावल यांचे आदेश

आमदार जयकुमार रावल यांनी मध्यावती निवडणुकांसाठी तयार राहण्याचे केलेले वक्तव्य राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना एकत्र आहेत. त्यांच्यातही दिग्गज अनुभवी नेते आहेत, परिपक्व आहेत. अनेक सरकारे बनवली आणि पाडली आहेत. अशा नेत्यांना राष्ट्रपती राजवटीची धमकी देणे हा सर्वात मोठा विनोद आहे.

हेही वाचा - कोणी घर देता का रे घर..?, धुळ्याच्या 'नटसम्राटाची' आपल्याच पाल्यांकडून अवहेलना

आमदार रावल यांनी मध्यावधीच्या निवडणुकीची नवी पुडी सोडली आहे. ज्यावेळी कुठलेही बहुमताचे सरकार स्थापन होण्याची शक्यता प्रत्यक्ष दिसून येते. त्यावेळी सर्वच राजकीय पक्ष सरकार स्थापनेत अपयशी ठरतात. तेव्हा राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतात. महाराष्ट्रात तर अजून सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला आरंभ झालेला नाही. प्रथम सरकार स्थापन होईल. मग बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपाल ठराविक कालावधी देतील. बहुमत स्थापनेस यश आले तर तेच सरकार कार्यरत होईल. दुर्देवाने अपयश आले तर राज्यपाल दुसऱ्या मोठ्या पक्षास निमंत्रण देतील. त्यांनी सरकार स्थापन केले तर पुन्हा बहुमत सिध्द करणे वगैरे प्रक्रिया सरू होतील. अर्थात त्यांनाही अपयश आले तर, मग राज्यपाल एक आठवडा वाट पाहतील. सरकार स्थापन करण्यासाठी जर कोणी आलेच नाही तरच राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची व मध्यवधी निवडणुकांची शिफारस करू शकतात, ही घटनात्मक तरतूद आहे, असेही गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Intro:
भाजप सेनेच्या सत्ता स्थापने दरम्यान मुख्यमंत्री पदावरून चाललेल्या रसीखेच मध्ये पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी फेर दिवडणुकांबद्दल केलेल्या वक्तव्यास धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून उत्तर दिले आहे त्यात अनिल गोटे यांनी भाजपात अनुभवाची कमी असलेले नव्याने भरणा झालेले व जुन्या अनुभवी नेतृत्वास अर्थात एकनाथ खडसे यांना पक्षाने डावलले नसते तर पक्षावर हास्यापद परिस्थिती उदभवली नसती अश्या आशयाचे पत्रक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.

Body:*भाजपाने मध्यावधी निवडणूका घेवून दाखवाव्यात*
* सदा सर्व काळ सर्वांना फतवू शकत नाही*.
* लोकसभेपूर्वी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठरल्यावरही नकार देणे राजकीय
असभ्यतेचे लक्षण*!

भाजप सेनेच्या सत्ता स्थापने दरम्यान मुख्यमंत्री पदावरून चाललेल्या रसीखेच मध्ये पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी फेर दिवडणुकांबद्दल केलेल्या वक्तव्यास धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून उत्तर दिले आहे त्यात अनिल गोटे यांनी भाजपच्या जुन्या नेतृत्वाला डावलल्यामुळे म्हणजे एकनाथ खडसे यांना डावलल्यामुळे भाजपात नेतृत्वाचा अभाव निर्माण झाला असून त्यामुळेच असे बेजबाबदार वक्तव्य भाजपच्या मंत्र्यांकडून समोर येत आहेत

भारतीय जनता पक्षाचे शिर्सस्त नवोदित नेते श्री.जयकुमार रावल यांनी मध्यावती निवडणूकांसाठी तयार राहण्याचे केलेले वक्तव्य राजकीय अपरिपक्वतेचे
लक्षण होय* ! भाजपा विरोधात काँग्रेस,राष्ट्रवादी सेना एकत्र आहेत. त्यांच्यातही दिग्गज अनुभवी नेते आहेत. परिपक्व आहेत. अनेक सरकारे बनवली आणि पाडली आहेत. अशा नेत्यांना राष्ट्रपती राजवटीची धमकी देणे हा सर्वात मोठा विनोद होय !आता श्री.जयकुमार रावल यांनी मध्यावधीच्या निवडणूकीची नवी पुडी सोडली आहे. ज्या वेळेस कुठलेही बहूमतांचे सरकार स्थापन होण्याची शक्यता प्रत्यक्ष दिसुन येते. सर्वच राजकीय पक्ष सरकार स्थापनेत अपयशी ठरतात. तेव्हा राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतात. महाराष्ट्रात तर अजून सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला आरंभ झालेला नाही. प्रथम सरकार स्थापन होईल. मग बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपाल ठराविक कालावधी देतील. बहुमत स्थापन्यास यश आले तर तेच सरकार कार्यरत होईल. दुर्देवाने अपयश आले तर राज्यपाल दुस-या मोठया पक्षास निमंत्रण
देईल. त्यांनी सरकार स्थापन केले तर पुन्हा बहुमत सिध्द करणे वगैरे प्रक्रिया सरू होतील. अर्थात त्यांनाही अपयश आले तर,मग राज्यपाल एक आठवडा वाट पाहतील. सरकार स्थापन करण्याकरीता जर कोणी आलेच नाही तर आणि तरच
राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची व मध्यवधी निवडणूकांची शिफारस करू शकतात.
ही घटनात्मक तरतुद आहे असेही गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हणले आहे.Conclusion:
Last Updated : Nov 4, 2019, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.