धुळे - मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्प केंद्र सरकारने एक हजार रुपयांची तरतूद करून धुळेकरांचा अपमान केला आहे. खोटे बोलून भाजपने सत्ता घालवली मात्र, तरीही भाजप खोटे बोलणे सोडत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची धुळ्यात पत्रकार परिषद पार पडली.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड: 'हैदराबाद एनकाऊंटर पॅटर्न महाराष्ट्रात अमलात आणा'
गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर कडाडून टीका केली आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात 5 हजार कोटींच्या कामासाठी एक हजार रुपयांची तरतूद करून केंद्र सरकारने धुळेकर नागरिकांचा अपमान केला आहे. एलआयसी आणि बीएसएनएल सारख्या कंपन्या उद्योगपतींना विकून त्यांच्याकडून आलेल्या पैशांवर देश चालवायचा अशा प्रकारचा भाजपने धंदा सुरू केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळेकर नागरिकांची फसवणूक करत असून, याच भाजपने खोटे बोलण्यापायी सत्ता गमावून देखील भाजप खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश