धुळे - साक्रीकडे जाणारा गॅस भरलेला टँकर धुळे तालुक्यातील नेर गावाजवळ उलटला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चालक जखमी आहे. जखमी चालकास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरतहुन जळगावकडे जाणारा (जी जे 12 ए1429) गॅसने भरलेला टँकर उलटला. हा टँकर धुळ्याहून साक्रीकडे जात होता. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे.