ETV Bharat / state

धुळ्यात ७ लाखांचा गुटखा जप्त, दोन जण ताब्यात - Dhananjay Dixit

आझादनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहराजवळील पारोळा चौफुलीजवळ गुटख्याने भरलेले एक वाहन जप्त केले.

आझाद नगर पोलीस ठाणे
author img

By

Published : May 14, 2019, 11:14 AM IST

धुळे - आझादनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहराजवळील पारोळा चौफुलीजवळ गुटख्याने भरलेले एक वाहन जप्त केले. या वाहनातून पोलिसांनी तब्बल ७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.

धुळ्यात गुटखा जप्त

एक केशरी रंगाची मालवाहू गाडीत (क्र. एम एच १९ सीवाय ३५४८) मध्य प्रदेशातून विमल गुटखा भरून धुळे शहरात येत असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने पारोळा चौफुलीजवळील एका पुलाच्या खाली सापळा रचून ही गाडी अ़डवली. यावेळी पोलिसांनी गाडीच्या चालक मोहम्मद अफरोज आलम अन्सारी (वय २२ वर्षे, रा पारोळा, जि. जळगाव) आणि सहकारी चंदूमल प्रितमदास नागदेव (वय ५३ वर्षे, रा. पारोळा, जि. जळगाव) यांना ताब्यात घेतले. यावेळी गाडीत काय आहे याची चौकशी केली असता अन्सारी आणि त्याच्या सहकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यांना या गाडीत १ लाख ७ हजार ७१२ रुपये किंमतीचे व्ही. जे. तंबाखूचे ३ हजार २६४ पाऊच आणि ६ लाख १० हजार ३६८ रुपये किंमतीचा विमल पान मसाला आढळून आला. पोलिसांनी गाडीतील सर्व मालासह १ लाख ५० हजार रुपये किंमतीची मालवाहू गाडीही जप्त केली आहे.

Intro:धुळे आझादनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहराजवळील पारोळा चौफुली जवळ गुटख्याने भरलेला एक वाहन जप्त केलं. या वाहनातून पोलिसांनी तब्बल ७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.

Body:धुळ्यातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक केशरी रंगाची मालवाहू गाडी एम एच १९ सीवाय ३५४८ या गाडीत मध्य प्रदेश राज्यातून विमल गुटखा भरून धुळे शहरात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने पारोळा चौफुली जवळील एका पुलाच्या खाली सापळा रचून या वाहनाची तपासणी केली. पोलिसांनी या वाहनाच्या चालकाला विचारणा केली असता मोहमद अफरोज आलम अन्सारी (वय २२, रा पारोळा, जि जळगाव) असे नाव सांगितले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या अन्य १ जणाची चौकशी केली असता एकाने चंदूमल प्रितमदास नागदेव (वय ५३, रा पारोळा, जि जळगाव) असे नाव सांगितले. यावेळी वाहनात काय आहे याची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी तपासणी केली असता या वाहनात १ लाख ७ हजार ७१२ रुपये किंमतीचे व्ही जे तंबाखूचे ३ हजार २६४ पाऊच एकूण १६ पोत्यांमध्ये भरलेले आढळून आले. यासोबत ६ लाख १० हजार ३६८ रुपये किमतीचा विमल पान मसाला, आणि १ लाख ५० हजार रुपये किंमतीची मालवाहू गाडी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.