धुळे - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. सोमवारी (दि. 1 जून) रात्री आलेल्या 41 अहवालांपैकी 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 164 वर पोहोचली आहे.
धुळे जिल्हा रुग्णालय येथील सोमवारी (दि. 1 जून) रात्री आलेल्या 41 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ते दोघेही पुरूष आहेत. यात धुळ्यातील स्वामी नारायण काॅलनी येथील 40 वर्ष पुरुष, तर पुरुष आझाद नगरमधील 35 वर्षीय व्यक्ती आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहचली 164 वर पोहोचली आहे.
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 81 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आजपर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - धुळे : खाकीतील माणुसकीचे दर्शन, पोलिसांनी वाचवले दोन चिमुकल्यांचे प्राण
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोनाबाधित पतीचा मृत्यू, अंत्यविधीनंतर हतबल महिलेची ७० किमी पायपीट