ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यात आणखी ९ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात आणखी ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : May 19, 2020, 7:04 PM IST

धुळे
धुळे

धुळे - जिल्ह्यातील दहा जणांनी कोरोनावर मात केली असताना आता आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 79 वर जाऊन पोहोचला आहे.

धुळे जिल्ह्यात आणखी ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, उर्वरित ७ रुग्णांपैकी नेहरू नगरातील ३, जिल्हा कारागृहातील ३, इंद्रप्रस्थनगरातील १ रुग्णाचा समावेश आहे. गल्ली नंबर ७मधील एकाचा मृत्यू झाला आहे. एका रुग्णाचे ठिकाण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७९ झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असल्याने चिंतेचे वातावरण आहे. महानगरांसह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण सापडत असल्याने कोरोना संकट गडद होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.