धुळे- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. आज हाती आलेल्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आणखी 3 रुग्णांची वाढ झाली आहे तर शिरपूर येथील एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे शासकीय यंत्रणेच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
शिरपूर शहरातील वाल्मिक नगर येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. त्या महिलेवर धुळे येथे हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार आज वाल्मिक नगर येथील 60 वर्षीय पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
धुळ्यात सध्या कोरोना बधितांचा आकडा 167 वरती जाऊन पोहोचला आहे तर आज झालेल्या शिरपूर येथील महिलेच्या मृत्यूनंतर धुळे जिल्ह्यात 20 कोरोना बाधितांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत 83 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. सध्या 64 रुग्णांवर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.