ETV Bharat / state

धुळ्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून 1 कोटी 90 लाख घरे बांधली; खासदार भामरेंचा अजब दावा!

शहरात पंतप्रधान आवास योजनेतून 1 कोटी 90 लाख घरे बांधली गेली असल्याचा अजब दावा डॉ. सुभाष भामरे यांनी केला आहे. भामरे यांच्या या वक्तव्याची सध्या धुळ्याच्या राजकीय क्षेत्रात चांगली चर्चा आहे.

खासदार डॉ. सुभाष भामरे
author img

By

Published : Aug 14, 2019, 7:33 PM IST

धुळे - शहरात पंतप्रधान आवास योजनेतून 1 कोटी 90 लाख घरे बांधली गेली असल्याचा अजब दावा डॉ. सुभाष भामरे यांनी केला आहे. भामरे यांच्या या वक्तव्याची सध्या धुळ्याच्या राजकीय क्षेत्रात चांगली चर्चा आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना धुळे महापालिकेत इमारत बांधकाम परवानगी पत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी लाभार्थ्यांशी बोलताना भामरे म्हणाले, देशातील एकही नागरिक बेघर राहू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

खासदार डॉ. सुभाष भामरे

मात्र, यावेळी बोलताना भामरे यांनी एक अजब वक्तव्य केले, ते म्हणाले धुळे शहरात पंतप्रधान आवास योजनेतून १ कोटी ९० लाख घरे बांधली गेली आहेत. येत्या काळात २ कोटी घरे बांधण्याचा आपला संकल्प आहे, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. धुळे शहराची लोकसंख्या ५ लाख असताना १ कोटी ९० लाख घरे कुठे आणि कशी बांधली गेली, याचा शोध घेण्याचे आव्हान आता विरोधकांसमोर असणार आहे. दरम्यान, भामरेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Intro:धुळे शहरात पंतप्रधान आवास योजनेतून 1 कोटी 90 लाख घरे बांधली गेली असल्याचा अजब दावा डॉक्टर सुभाष भामरे यांनी केला आहे. डॉक्टर भामरे यांच्या वक्तव्याची सध्या धुळ्याच्या राजकीय क्षेत्रात चांगली चर्चा आहे. Body:धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना धुळे महापालिकेत इमारत बांधकाम परवानगी पत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी लाभार्थ्यांशी बोलतांना डॉ सुभाष भामरे म्हणाले, देशातील एकही नागरिक बेघर राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मात्र यावेळी बोलताना डॉ सुभाष भामरे यांनी एक अजब वक्तव्य केलं, डॉ भामरे म्हणाले धुळे शहरात पंतप्रधान आवास योजनेतून एक कोटी 90 लाख घरे बांधली गेली आहेत. येत्या काळात 2 कोटी घरे बांधण्याचा आपला संकल्प आहे. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. धुळे शहराची लोकसंख्या ही 5 लाख असताना 1 कोटी 90 लाख घरे कुठे आणि कशी बांधली गेली, याचा शोध घेण्याचं आवाहन आता विरोधकांसमोर असणार आहे. दरम्यान डॉ भामरेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.