ETV Bharat / state

अवघ्या 60 रुपयांसाठी युवकाची हत्या; चंद्रपूर शहरातील जुनोना येथील घटना

अवघ्या 60 रुपयांसाठी युवकाची हत्या झाल्याचा प्रकार चंद्रपूरा शहरात घडला आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

youth was killed for Rs 60 in Chandrapur
अवघ्या 60 रुपयांसाठी युवकाची हत्या; चंद्रपूर शहरातील जुनोना येथील घटना
author img

By

Published : Mar 3, 2021, 6:54 PM IST

चंद्रपूर - शहरातील जूनोना रस्त्यावरील विक्तूबाबा मठाजवळ एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याचे समोर आले आहे. मृत युवकाचे नाव सून चांदेकर (वय- 26) असे आहे. ही हत्या 60 रुपयांच्या वादतून आरोपीने चाकून भोसकून झाल्याचे समोर आले आहे.

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात युवकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत युवकाचे नाव सोनू चांदेकर-(26 ) असे आहे. मंगळवारी रात्री धारदार शस्त्रांनी युवकाची हत्या केली. या हत्येमागे केवळ 60 रु. जुन्या उधार पैशाचा वाद होता, अशी माहिती हाती आली आहे. बाबुपेठ वॉर्डातल्या तुकाराम महाराज चौकात मृत युवक जेवण झाल्यावर फिरायला आला होता. तेव्हा उधार रकमेविषयी विचारणा करत आरोपी पवन पाटीलने (वय -20) भांडण उकरून काढले. काही कळण्याच्या आत धारदार शस्त्राने वार करून त्याला संपविले. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेने रात्रीच शोधकार्य हाती घेतले. आरोपीला 60 किमी दूर मारोडा या गावातून ताब्यात घेत रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. हत्येचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

जिल्ह्यात खून करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संघटित गुन्हेगारीतून कट रचून खून करण्याचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यापूर्वी सूरज बहुरीया व राजू यादव यांचा बंदुकीने खून तर शुभम फुटाणे याचा धारदार शस्त्राने खून झाल्याचे समोर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीवर डोके वर काढू लागली आहे. यावर आळा कसा बसेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा चंद्रपूर जिल्हा बिहार राज्यातील गुंडगिरीचा जिल्हा बनेल अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांत उमटत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.