चंद्रपूर- वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याची बाब उघड झाली आहे. सुखदेव सोनुने असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सुखदेव सोनुने हे वाहतूक शाखेत कार्यरत होते. २३ नोव्हेंबरला सोनुने हे पोलीस वसाहतीतील आपल्या घरात संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या डोक्यावर अनेक जखमा होत्या. मात्र, त्यांच्याशी कुणाचेही शत्रुत्व नसल्याने संशय घेण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे त्यांच्या पत्नीच्या सांगण्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
याप्ररणी पोलिसांकडून सुखदेव सोनुने यांचा मुलगा तुषार सोनुने याची विचारपूस करण्यात आली. विचारपूस करताना सुखदेव सोनुने यांचा मुलगा तुषार याच्या सांगण्यात अनेक विसंगती समोर आल्या. कसून चौकशी केली असता, आपल्या वडिलांची हत्या आपणच केल्याची धक्कादायक कबुली आरोपी तुषार सोनुने याने दिली. घटनेच्या दिवशी आपली वडिलांशी बाचाबाची झाली होती. त्यामुळे वडिलांना लोखंडी रॉडने मारले असल्याचे तुषारने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- 'त्या' वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक; वृद्धापकाळ, भुकेने मृत्यू झाल्याचा अंदाज