चंद्रपूर - विश्वातील सर्वात कमी उंचीची महिला असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ज्योती आमगेच्या नावाने आहे. याच ज्योती चिमुर येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित भव्य डॉन्स कॉम्पीटेशनमध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होती. कार्यक्रमानिमीत्त ऐतिहासिक चिमूरच्या क्रांतीविरांचे स्मरण करून क्रांती भूमीस नमन करून कृतज्ञता व्यक्त केली.
रंजना आणी किसन यांना १६ डिसेंबर १९९३ मध्ये मुलगी झाली. मात्र, तिची एकॉन्ड्रोप्लेसिया या रोगाने सामान्यता उंची वाढलीच नाही. वय वाढले तशी उंची वाढली नसल्याने सर्वत्र एक विनोदाचे पात्र झालेल्या ज्योती आमगेच्या जीवनाला वयाच्या १८ व्या वर्षी कलाटली मिळाली. १६ नोव्हेंबर २०११ ला तिच्या या उंचीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डच्या अधिकाऱ्यांनी घेतली. ५७ व्या ऑडीशनमध्ये विश्वात कमी उंचीची महिला म्हणून तिच्या नावाची नोंद करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण जगाला ज्योती आमगेची ओळख झाली. सेलीब्रिटी म्हणून विविध कार्यक्रमामध्ये तिला प्रमूख पाहुण्यांचा मान मिळायला लागला.
हेही वाचा - 'नाद नको दादा, पाठीशी बाय माझी... स्वीटी!', 'स्वीटी सातारकर'चं गाणं लाँच
स्वतःच्या उंची विषयी न्यूनगंड न ठेवता सकारात्मक दृष्टीकोन ठेवणाऱ्या ज्योतीला जगभर फिरायला मिळत असल्याने ती आनंदी आहे. चिमूरच्या क्रांती भूमीत सत्यफुलाबाई पांडूरंगजी कावरे स्मृती प्रित्यर्थ भव्य डांन्स कॉम्पीटेशनचे आयोजन करण्यात आले होते. येथे ज्योती आई-वडील, बहीण आणि भाऊजीसोबत आली होती. तिला बघण्यासाठी चिमूरकरांनी एकच गर्दी केली. यावेळी ज्योतीने चिमूरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. श्रीहरी बालाजींचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा येणार असल्याचे सांगीतले.