ETV Bharat / state

World Tiger Day : जागतिक व्याघ्रदिन विशेष! 'वाघांच्या जिल्ह्यात' तब्बल अडीचशे वाघांचा मुक्तसंचार

आज जगभरात व्याघ्रदिन ( World Tiger Day ) साजरा केला जातो. त्यामुळे एका प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. जागतिक व्याघ्रदिनाला अनेक वन्य प्रेमी जंगलात सफारीला प्राधान्य देतात. त्यामुळे राज्याच्या महसूलातही चांगली भर पडत असते. त्याचवेळी नागरिकांकडून वन्य प्राण्यांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारे मदतही केली जाते. यावर्षी चंद्रपूरच्या वन अकाडमीच्या परिसरात साजरा केला जातो आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद यादव, केंद्रिय पर्यवरण वन राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हे उपस्थित राहणार आहेत. सोबतच नवी दिल्ली येथील नॅशनल टायगर कंझरवेशन ऑथोरेटी यांचे मेंबर, वरिष्ठ अधिकारी ही उपस्थित राहणार आहेत.

Worlds Tiger Day
जागतिक व्याघ्रदिन
author img

By

Published : Jul 29, 2022, 12:00 PM IST

चंद्रपूर - 29 जुलै हा जागतिक व्याघ्रदिन ( World Tiger Day ) म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे वाघांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरमध्ये अनेक प्राणीप्रेमी भेट देतात ( Animal Lovers Visit Chandrapur ). संपूर्ण महाराष्ट्रात जितके वाघ आहेत. त्यापैकी अर्ध्याहून अधिक वाघ हे एकटे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. येथील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प येथे जवळपास दीडशे वाघ आहेत. तर या व्यतिरिक्त जिल्ह्यात आणखी अंदाजे शंभर वाघ हे इतरत्र जंगलात मुक्तसंचार करीत आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची खऱ्या अर्थाने वाघांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली ( Chandrapur Like to known as tiger district ) आहे.

सर्वाधिक जंगल संपदा ही चंद्रपुरात - राज्यातील सर्वाधिक जंगलाची संपदा ( Forest Wealth ) ही पहिल्यांदा चंद्रपुरात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ( Tadoba-Andhari Tiger Project ) हा राज्यातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प ( The Largest Tiger Reserve ) आहे. तब्बल 625 वर्गकिलोमीटर इतका विस्तीर्ण हा या परिसरात आहे. मात्र या व्यतिरिक्त देखील चंद्रपूरचे जंगल पसरले आहे. ब्रम्हपूरी, वरोरा, सावली, सिंदेवाही या तालुक्यात वाघांची संख्या मोठी आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन - व्याघ्रदिवस हा राष्ट्रीय पातळीवर दिल्लीत दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी चंद्रपूरच्या वन अकाडमीच्या परिसरात साजरा केला जातो आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद यादव, केंद्रिय पर्यवरण वन राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हे उपस्थित राहणार आहेत. सोबतच नवी दिल्ली येथील नॅशनल टायगर कंझरवेशन ऑथोरेटी याचे मेंबर, वरिष्ठ अधिकारी ही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रामावेळी दिमाखदार परेडही आयोजित करण्यात आली आहे. ती टिम महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील जी व्याघ्रसंवर्धन आहे त्यायाठी नेहमी झटत राहिलीली एसपीएयफ आहे. त्यांचा हा चमू ही परेड करणार आहे. त्याशिवाय सेवेत असताना काही कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांना पारितोषिक देऊन सन्मामीत करण्यात येणार आहे.

कलाकारांची व्याघ्रप्रकल्पाला भेट - अनेक वन्य प्रेमी आणि प्राणी प्रेमी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाला भेट देत असतात. त्यात अनेक कलाकारांचाही समावेश असतो. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख त्याची अभिनेत्री पत्नी जेनेलिया (Riteish deshmukh and Genelia Dsouza) यांनी आपल्या दोन मुलांसह ताडोबात सफारी केली होती. नागपूरमार्गे ते मुधोली येथील लिंबन नामक रिसॉर्टमध्ये दाखल झाले. रितेशने आपल्या कुटुंबासह ताडोबातील कोअर झोनमध्ये सफारी केली होती, मात्र वाघाचे दर्शन झाले नाही. जिप्सीवरून सफरीला जातानाचा त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला होता. दोन दिवस रितेशचा ताडोबात (Tadoba-Andhari Tiger Project ) मुक्काम होता. रितेश आणि जेनेलियाची एक झलक बघण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागलेली होती.त्याशिवाय उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, अनिल कुंबळे, कुणाल खेमु, सोहा अली खान अशा अनेक जगप्रसिद्ध सेलिब्रिटींनी ताडोबात हजेरी लावली होती. सचिन तेंडुलकर तर दरवर्षी सहकुटुंब ताडोबात सफारीला जातो.

मानव-वन्यजीव संघर्ष - जिल्ह्यात वाघांची संख्या मोठी असल्याने येथे मानव-वन्यजीव संघर्ष देखील शिगेला पोचला आहे. त्यात कधी माणसाचा मृत्यू होतो. तर कधी वाघाचा बळी जातो. जंगलालगत अतिक्रमण वाढले आहे, येथे शेती केली जाते. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. त्यापासून बचाव करण्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांकडून जालीम उपाय शोधला जातो. शेतीच्या कडेला जिवंत विद्युत तारांचे कुंपण केले जाते यात कधी वाघांचा सुद्धा बळी जातो. मग, त्यावर पांघरूण घालण्यासाठी त्या वाघाची विल्हेवाट तिथेच लावली जाते. अनेक प्रकरणांत हा प्रकार समोर आला आहे. अनेकदा हा प्रकार कित्येक महिने, वर्षांनंतर उघडकीस येतो. त्यामुळे अशा शिकारी रोखण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे. तर काही ठिकाणी जंगली प्राण्यांच्या मांसासाठी त्याची शिकार केली जाते. यासाठी फास आणि इतर शिकारी पद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र यात अनेकदा वाघाचा देखील बळी जातो.

समाज कंटकांडून तस्करी - मृत वाघांच्या अवयवांची देखील विभागणी केली जाते. नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथे वनविभागाने काही तस्करांना अटक केली होती. आरोपी अवयवांची तस्करी करताना पकडले गेले होते. या चौकशीचे धागेदोरो तर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोहोचले होते. यासाठी अनेक वाघांची सुनियोजितरित्या शिकार केल्याचे देखील समोर आले. त्यामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या जरी मोठी असली तरी त्यांच्या बचावासाठीचा संघर्ष वनविभागाला करावा लागतो आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray Resign MLA Seat :विधान परिषदेतील ठाकरेंच्या जागेसाठी रस्सीखेच; शिवसेना आणि शिंदे गटाकडून दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.