चंद्रपूर - बल्लारपूर पेपरमीलच्या लाकुड डेपोला काल दुपारी तीन वाजता लागलेली आग 18 तास उलटूनही अजूनही धगधगत आहे. ही आग विझविण्यासाठी कालपासून 25 अग्निशमन वाहने कार्यरत आहेत. मात्र अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यास यश आलेले नाही. या आगीत बल्लारपूर पेपरमिलचे दोन, खासगी एक आणि एक पेट्रोलपंप जळून खाक झाले. लाखो टन लाकूड यात जळून खाक झाले ज्याची किंमत 15 कोटींच्या वर असल्याचे सांगण्यात येत आहे.
80 टक्के आग आटोक्यात : तहसीलदार - रात्रभर आग विझविण्याचे काम अविरत सुरू होते. यासाठी 25 अग्निशमन वाहनांचा वापर करण्यात आला. आज सकाळपर्यंत जवळपास 80 टक्क्यांपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली आहे, सकाळी वारा असल्याने ती पसरू नये याची दक्षता घेतली जात आहे. जंगलात ही आग पसरू नये यासाठी काळजी घेतली जात आहे, आग आटोक्यात आली असली तरी संपूर्ण दिवसभर हे काम चालणार आहे, अशी माहिती बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली.
बल्लारपूर मार्गावर असलेल्या बल्लारपूर पेपरमिलच्या लाकूड डेपोला रविवारी दुपारी भीषण आग लागली. जी अजूनही शमलेली असून आणखी रुद्रावतार घेत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही. या भीषण ( Parmil wood depot fire Ballarpur ) आगीत आतापर्यंत शेकडो टन माल जळून खाक झाला असून, या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर, मुल, भद्रावती, वरोरा येथील अग्निषण विभागाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आल्या आहेत. शेजारी पेट्रोल पंप असल्यामुळे आगीवर नियंत्रण न मिळाल्यास मोठी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी सर्व शासकीय अधिकारी, पोलिस, आणि व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्ध स्थळावर सुरू आहे.
आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु : कळमना डेपो'च्या काही अंतरावर जंगलात आज सकाळच्या सुमारास वणवा पेटला होता. मात्र, उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग सर्वदूर पसरली. आणि शेजारी असलेल्या पेपरमिल डेपो पर्यंत पोहोचली. डेपोत बांबू आणि लाकडे असल्यामुळे निम्या वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले. बल्लारपूर पेपरमिल (बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रोडक्टस लिमिटेड बल्लारपूर) ही एशियामधील सर्वात मोठी पेपर कंपनी यांचा बांबू डेपो बल्लारपूर शहरापासून साधारणतः १० किमी अंतरावर कळमना येथे लाकडाचे मोठे डेपो आहेत. याठिकाणी कारखान्याचा मोठ्या प्रमाणात लाकूड साठा केला जातो. आज दुपारी 3 च्या दरम्यान अचानक लागलेल्या आग लागली. ही आग इतकी भिषण होती कि निम्या वेळात आगीने संपूर्ण डेपोला आपल्या कवेत घेतले. प्राप्त माहितीनुसार यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारखान्याचा कोट्यावधीचा माल जळून खाक झाला आहे. सध्या डेपोमध्ये साधारणतः कोट्यवधी रुपयांच्या किमतीचा लाकडाचा साठा होता. सोबतच बाजूला बालाजी कंपनीचा ऑफिस आणि मजुरांच्या झोपड्या व लगतच फुलझले यांच्या मालकीचे साहील पेट्रोल पंप आहे. आग सर्वत्र पसरल्यामुळे पेट्रोल पंपला त्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पेट्रोल पंप शेजारी आग पसरली आहे. सध्या या आगीवर नियंत्रण करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र, आग भीषण असल्यामुळे तूर्तास आग आटोक्यात येण्याची शक्यता कमी असल्याचे सबंधित यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. डेपोतील कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेतल्यामुळे जीवित हानी टळली आहे.
हेही वाचा - Gorewada Zoo Fire : आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील जंगलाला आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश