चंद्रपूर - भद्रावती तालुक्यातील सुमठाणा-तेलवासा मार्गावर एका अज्ञात तरुणीचा शिरावेगळा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसमोर ( ITI Chadrpaur women murder case ) शिवारात तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला.
सोमवारी ( 4 एप्रिल ) सकाळी ११ वाजताच्या सुमारास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूचा परिसर असलेल्या शेतशिवारात काही लोकांना तरुणीचा शीर नसलेला मृतदेह नग्नावस्थेत ( headless body of a young woman ) आढळून आला. या युवतीचे वय अंदाजे 20 ते 22 वर्ष असल्याचे समजते. याबाबतची माहिती भद्रावती पोलिसांना ( ( Bhadrawati Police Chandrapur ) देण्यात आली. पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचे शीर गायब आणि शरीरावर कुठलेही कपडे नसल्याने या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठले.
पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत चार मुली बेपत्ता- घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. चंद्रपूरवरुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. शिराचा शोध घेण्यासाठी आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे. भद्रावती पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत चार मुली बेपत्ता असल्याची नोंद आहे. या चारही मुलींच्या पालकांना घटनास्थळी आणून ओळख करून घेण्यात आली. मात्र, कुणीही या मृतदेहाच्या ओळखीला दुजोरा दिला नाही. त्यामुळे या मृतदेहाची ओळख कशी पटवायची हे मोठे आव्हान पोलीस विभागासमोर उभे ठाकले आहे. पुढीप तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा-ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची कमी, बेवड्यांची जास्त काळजी - फडणवीस