चिमूर (चंद्रपूर) - केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी विषयीचा अभ्यास करण्याकरीता केंद्रीय ग्रामविकास संसदीय स्थायी समितीने २० आगस्टला सकाळी कोलारा ग्राम पंचायतीला खासदार नारायणभाई रठवा यांचे नेतृत्वात भेट दिली. केंद्राच्या विविध योजना ग्राम पातळीवर राबविल्या जातात की नाही, यात येणाऱ्या अडचणी याविषयी माहीती घेण्याकरीता समीतीचा हा अभ्यास दौरा असल्याचे नारायणभाई रठवा यांनी सांगितले.
समितीत कोण?
या समितीमध्ये खासदार सुजित कुमार, खासदार अजय प्रतापसिंग, खासदार दुबे यांच्यासह संयुक्त सचिव देशराज शेखर, कार्यकारी अधिकारी अतुल यांचा समावेश होता. प्रधानमंत्री सडक योजना आणि विविध योजना या भागात कार्यन्वित का झाल्या नाहीत, याबाबतही यावेळी विचारणा करण्यात आली.
हेही वाचा - बैलगाडी शर्यत प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे दाखल
घरकुल योजनेच्या लाभार्थ्याशी संवाद -
कोलारा ग्रामपंचायत सरपंच सचिन डाहुले यांनी गावात असलेल्या पिण्याच्या पाण्याची समस्या तथा रिसोर्टकडून नियमित कर भरत नसल्याने विकास कामात अडचणी येत असल्याचे समितीला सांगितले. यांनतर समिती सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पाहणी केली. ग्रामसभेकरिता पुरेसे सभागृह नसल्याने याची सुविधा करून देण्याची सुचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यांनतर प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभार्थी सुर्यभान हरीभाऊ कामडी यांचे घरी जाऊन त्यांचेशी समितिच्या सदस्यांनी संवाद साधला.