ETV Bharat / state

विरोधी खासदार निलंबन प्रकरणी विजय वडेट्टीवारांची केंद्रावर टीका; म्हणाले 'बेशरमपणाचा कळस' - PM Narendra Modi

Vijay Wadettiwar On PM : भारतातील पाच महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी (3 डिसेंबर) जाहीर झाले. यातील तीन राज्यात भाजपानं बहुमत मिळवलं होतं. तर एका राज्यात काँग्रेसला बहुमत मिळवण्यात यश आलं होतं. तर निदान दोन राज्ये जरी आमच्याकडे आले असतील तरी देशाचा दृष्टिकोन बदलला असता, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय.

Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 10:19 PM IST

प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार

चंद्रपूर Vijay Wadettiwar On PM : पाच राज्यांचा निकाल हा लोकांसाठी धक्कादायक आहे. राजकीय सर्व्हेमध्ये देखील तीन राज्यात काँग्रेस विजयी होत असल्याचा अंदाज होता. स्वतः लोकंच काँग्रेसचं नाव घेत होते. निदान दोन राज्ये जरी आमच्याकडे आले असती तर देशाचा दृष्टिकोन बदलला असता. असं झालं असतं तर 2024 चे देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नसते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय.

हा तर बेशरमपणाचा कळस : काहीही चूक नसताना संसदेच्या सत्रात तब्बल 146 खासदारांना निलंबित करण्यात आलं. ही हुकूमशाही आहे. या सरकारला विरोधी पक्षच नको आहे. कारण आजवरच्या संसदेच्या इतिहासात अशी घटना घडली नाही. उलट निलंबित केलेल्या खासदारांबाबत कारवाई करण्यात येत आहे. हा बेशरमपणाचा कळस आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते चंद्रपूर येथे आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ईव्हीएमबाबत लोक बोलत आहेत : पाच राज्यांच्या विधानसभेचा निकाल हा लोकांसाठी धक्कादायक आहे. मध्यप्रदेश येथे एका बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला शून्य मत मिळालं. यासाठी आता तो उमेदवार न्यायालयात गेला आहे. हे कसं शक्य आहे? अनेक राज्यात दहा पैकी सात लोक हे स्वतः काँग्रेससोबत येणार असल्याचं सांगत होते. अशावेळी असा निकाल येणं हा मतदारांसाठी धक्कादायक होता. त्यामुळंच ईव्हीएम मशीनबाबत लोक आता शंका उपस्थित करू लागले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

तीन राज्यांच्या निकालावर जाऊ नका : जरी तीन राज्यात काँग्रेस पराभूत झाले असली तरी एकूण मतदान हे काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त झाले आहे. राजस्थान आणि छत्तीसगड येथे अवघ्या दोन ते चार टक्क्यांचा आहे, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. 'अजित पवार नको' असे पत्र कुणाला लिहिणार - वडेट्टीवार यांचा सवाल; 'त्या' पत्रावरून विरोधकांनी भाजपाला घेरलं
  2. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक; विधानसभेच्या पायऱ्यांवर गळ्यात संत्र्यांच्या माळा घालून आंदोलन
  3. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा न करता सरकारचा अधिवेशनातून पळ - विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.