ETV Bharat / state

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी कुंटुंबासह बजावला मतदानाचा हक्क - विजय वडेट्टीवारांनी कुंटूबासह बजावला मतदानाचा हक्क

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. ते ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

विजय वडेट्टीवारांनी कुंटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Oct 21, 2019, 11:40 AM IST

चंद्रपूर - विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. ते ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी त्यांनी ब्रम्हपुरीमधील देलनवाडी मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला.

विजय वडेट्टीवारांनी कुंटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा
राज्यातील प्रत्येक मतदाराने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. आपल्या मतातून राज्यात परिवर्तन घडवावे असे वक्तव्य विजय वडेट्टीवार म्हणाले. राज्यात पुन्हा कायद्याचे राज्य आणण्यासाठी सर्वांनी हक्क बजावणे गरजचे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

किती मतदार बजावणार मतदानाचा हक्क? -
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

मतदान केंद्र -
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro: विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता, विधानसभा आणि ब्रम्हपुरी विधानसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पिरिपा कवाडे ग्रुप आघाडीचे उमेदवार यांनी आज सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनी प्राथमिक शाळा ब्रम्हपुरी शहरातील देलनवाडी बूथ no. 8. अ येथे परिवारासह मतदानाचा हक्क बजावला .Body:विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.