ETV Bharat / state

Chandrapur News : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडे समर्थक आमनेसामने

आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले भिडे गुरुजी एका कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले असता त्यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी भिडे समर्थक आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून पुढील अनर्थ टाळला.

author img

By

Published : Jul 23, 2023, 7:58 PM IST

Sambhaji Bhide
चित आणि संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने

चंद्रपूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे भिडे गुरुजी हे एका कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले असताना त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उतरले. यावेळी भिडे यांचे समर्थक आणि वंचितचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी त्वरित यात हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांची वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

वंचितचा विरोध : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवनात आज रविवारी येथे बैठका होती. त्यामुळे या सर्व बैठकीला शिवभक्त बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडू करण्यात आले होते. तर दुसरीकडे संभाजी भिडेंची सभा उधळून लावण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला होता. कुठला अनर्थ होऊ नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त करून ठेवला होता.

भिडे यांच्यावरोधात घोषणाबाजी : याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले होते. संभाजी भिडे यांची जाहीर सभा चंद्रपूरमध्ये 23 रोजी होत आहे. त्यामुळे भिडे यांचा तात्काळ कार्यक्रम रद्द करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यासंदर्भात भिडे यांची आज रविवारी बैठक होती. याची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांची बैठक उधळून लावली. याचवेळी पोलिसांनी जवळपास 100 जणांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. तसेच कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भिडे यांच्या समर्थकांनी देखील घोषणाबाजी केली.

यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाकार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव मधुकर उराडे, जिल्हा उपाध्यक्ष कपुरदास दुपारे, विजु इंगोले, राहुल चौधरी,शहर अध्यक्ष बंडू ठेंगरे, शहर कार्याध्यक्ष सतिश खोब्रागडे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष कविता गौरकार, शहर महिला आघाडी अध्यक्ष तनुजा रायपूरे, शहर महिला महासचिव मोनाली पाटील यांचा समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.