ETV Bharat / state

बल्लारपूर सैनिकी शाळेतील बांधकाम कामगारांचे आर्थिक शोषण, उलगुलान संघटनेची कारवाईची मागणी - भिवकुंड

कंपनीने स्थानिक कामगारांना कामावर घेतले. परंतु, कित्येक दिवस कंपनीने कामगारांना पगार दिला नाही. कामगार पगारासाठी दररोज हेलपाटे घालतात. त्यांना पगार न देता परत पाठविले जात आहे.

उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे
author img

By

Published : May 10, 2019, 11:01 PM IST

चंद्रपूर - बल्लारपुर तालुक्यातील भिवकुंड येथे सैनिकी शाळेच्या बांधकामासाठी न्याती इंजीनिअरिंग अॅन्ड कन्सलटन्सी या कंपनीला बांधकामाचे कंत्राट दिले आहे. कंपनीने स्थानिक कामगारांना कामावर घेतले. परंतु, कित्येक दिवस कंपनीने कामगारांना पगार दिला नाही, असा आरोप उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केला आहे.

उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांची प्रतिक्रिया

कंपनीचे सुपरवायझर जगदिश खेंगर यांच्याद्वारे येथील कामगार काम करायचे. परंतु, या सुपरवायझरचे निधन झाल्यामुळे याच कंपनीतील दुसरे सुपरवायजर एम. डी. सैदुलआलम यांनी कामगारांना पगार मिळवुन देण्याचे सांगितले. पण अजुनपर्यंत या कंपनीने कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला नाही. कामगार पगारासाठी दररोज हेलपाटे घालतात. त्यांना पगार न देता परत पाठविले जात आहे. त्यामुळे सबंधित कामगारांचे मानसिक व आर्थिक शोषण होत असुन कामगारांवर व त्यांच्या कुटुबांवर उपासमारिची पाळी आलेली आहे.

उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी प्रशासनाला मध्यस्थी करुन स्थानिक कामगारांचा पगार मिळवुन द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच कामगारांचे शोषण करणाऱया सबंधित कंपनीवर आणि सुपरवायझरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा राजु झोडे, रमेश सोनकर, परमेश्वर नरांजे, राजु वर्मा, संतोष केसकर यांनी दिला आहे.

Intro:
चंद्रपुर : बल्लारपूर सैनिकी शाळेतील बांधकाम कामगारांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतनच दिले जात नसल्याचा आरोप उलगुलान संघटनेचे राजू झोडे यांनी केला आहे.Body:
बल्लारपुर तालुक्यातील मौजा भिवकुंड येथे सैनिकी शाळेच्या बांधकामाकरिता न्याती ईंजिनीयरींग एन्ड कन्सलटन्सी कंपनी या कंपनीला बांधकामाचे कंत्राट असुन या कंपनीमधे स्थानिक कामगारांना कामावर घेतले. परंतु कित्येक दिवस लोटुनही या कंपनी ने कामगारांचे काम केलेला पगार दिला नाही. या कंपनीचे सुपरवायजर जगदिश खेंगर यांच्याद्वारे येथिल कामगार काम करायचे परंतु या सुपरवायजर चे निधन झाल्यामुळे याच कंपनीतील दुसरे सुपरवायजर एम. डी. सैदुलआलम यांनी कामगारांना पगार मिळवुन देण्याचे सांगितले परंतु अजुनपर्यंत या कंपनी ने कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला नाही. कामगार पगारासाठी दररोज हेलपाटे घालत असुन त्यांना पगार न देता परत पाठविले जात आहे. त्यामुळे सबंधित कामगारांचे मानसिक व आर्थिक शोषण होत असुन कामगारांवर व त्यांच्या कुटुबांवर उपासमारिची पाळी आलेली आहे. याची दखल घेत उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी प्रशासनाला मध्यस्थी करुन स्थानिक कामगारांचा पगार मिळवुन द्यावा अशी मागणी केली. तसेच कामगारांचे शोषण करणार्या सबंधित कंपनीवर व सुपरवायजर वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांचेवर कारवाई करावी करिता तहसिलदारांना निवेदन दिले. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा राजु झोडे, रमेश सोनकर, परमेश्वर नरांजे, राजु वर्मा, संतोष केसकर यांनी दिला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.