ETV Bharat / state

चिमूर-कान्पा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू एक जखमी - दोन दुचाकींचा अपघात

चिमूर-कान्पा मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

accident on chimur kanpa road
accident on chimur kanpa road
author img

By

Published : Jun 27, 2021, 4:58 PM IST

चिमूर (चंद्रपूर) - चिमूर-कान्पा मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अजय महादेव राऊत (वय ४७ वर्ष रा.इंदिरा नगर चिमूर) व सन्नी राम आरेवा (वय २४ रा.खामखरली जि.शिवणी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात अतुल मधुकर चौधरी (वय २३ वर्ष रा.नाचणभट्टी त.सिंदेवाही) हा जखमी झाला आहे.

वाहतूक पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष -

चिमूर येथील इंदिरा नगरमधील रहिवाशी अजय महादेव राऊत हा बांधकाम ठेकेदार आहे. सावरगाव येथील मजूर घेऊन अजय दुचाकीने (क्रमांक एम एच ३४ ए वाय ८७o८) चिमूरकडे निघाला होता. तर चिमुर-कान्पा मार्गावरील खरकाडा येथील पुलाचे काम करणारे मजूर सनी राम आरेवा व अतुल मधुकर चौधरी दुचाकीने (क्रमांक एम एच ३४- ६४o९) कामाच्या ठिकाणी खरकाडा येथे निघाले होते. सन्नी आरेवा दुचाकी भरधाव चालवत होता. त्यामुळे त्यांच्या दुचाकीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालयाजवळील टि पाँइटवर थांबण्याचा ट्राफीक पोलिसांनी इशारा दिला होता.

घटनास्थळावर पोहचले पोलीस -

ट्राफिक पोलिसांच्या इशाऱ्यास न जुमानता सन्नीने पुन्हा दुचाकीचा वेग वाढवला. ज्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून चुकीच्या बाजुने दुचाकी गेली व विरुद्ध दिशेने येणाऱ्या अजय राऊत याच्या दुचाकीस जोरदार धडकली. धडक बसल्याने अजय राऊत रस्त्याच्या बाजुला तर सन्नी रस्त्यावर उडून पडले. हाकेच्या अंतरावर असलेले ट्रॉफिक पोलीस अपघाताच्या आवाजाने घटनास्थळावर धावले. तिघांनाही नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी उप-जिल्हा रुग्णांलय येथे हलविले. तिघांची डॉक्टरणी तपासणी केली असता अजय राऊत व सन्नी आरेवा यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोळ, उप पोलीस निरीक्षक अलिम शेख घटनास्थळावर पोहोचले व घटनेचा पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मुसाफीर रजिस्टरमध्ये नाव नोंदवा -

सन्नी काम करीत असलेल्या ठेकेदार धार्मीक पटेल यांचेकडे त्याच्या बद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे सन्नीचे पूर्ण नाव, गाव माहीत करण्याकरीता बरेच प्रयत्न करावे लागले. यासाठी प्रत्येक कंत्राटदाराने त्याचेकडे काम करणाऱ्या प्रत्येकाची इत्यंभूत माहिती ठेऊन पोलिस स्टेशन मधील मुसाफिर रजिस्टरवर नोंद करावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोळ यांनी केले असून नोंद न करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.