चंद्रपूर : मानव-प्राणी संघर्ष रोखण्यासाठी चंद्रपुरात पकडलेल्या दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले आहे. व्याघ्र ट्रान्स्लोकेशन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या वाघांवर नजर ठेवण्यासाठी रेडिओ कॉलर, 300 हून अधिक कॅमेरे, सुमारे 400 पॅड ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याच्या उद्देशाने दोन वाघिणींना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले आहे. व्याघ्र ट्रान्स्लोकेशन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चंद्रपुरात नुकत्याच वनविभागाने पकडलेल्या दोन वाघिणींचा यात समावेश आहे. आज शनिवारी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (NNTR) त्यांना सोडण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
-
Maharashtra | Artificial translocation of tigers has been done for the first time in the state. Two tigers were released today in Navegaon-Nagzira Tiger Reserve. These tigres were artificially translocated from the Bramhapuri forest zone. Through this experiment, research will be… pic.twitter.com/gX8WUEeEfq
— ANI (@ANI) May 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | Artificial translocation of tigers has been done for the first time in the state. Two tigers were released today in Navegaon-Nagzira Tiger Reserve. These tigres were artificially translocated from the Bramhapuri forest zone. Through this experiment, research will be… pic.twitter.com/gX8WUEeEfq
— ANI (@ANI) May 20, 2023Maharashtra | Artificial translocation of tigers has been done for the first time in the state. Two tigers were released today in Navegaon-Nagzira Tiger Reserve. These tigres were artificially translocated from the Bramhapuri forest zone. Through this experiment, research will be… pic.twitter.com/gX8WUEeEfq
— ANI (@ANI) May 20, 2023
राज्यात प्रथमच वाघांचे कृत्रिम ट्रान्सलोकेशन करण्यात आले आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आज दोन वाघ सोडण्यात आले आहे. ब्रम्हपुरी वनक्षेत्रातून या वाघांचे कृत्रिमरित्या स्थलांतर करण्यात आले. या प्रयोगाच्या माध्यमातून वाघांच्या कृत्रिम स्थलांतरावर संशोधन केले जाणार आहे. या वाघांवर नजर ठेवण्यासाठी रेडिओ कॉलर, 300 हून अधिक कॅमेरे, सुमारे 400 पॅड ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटन वाढण्यासही मदत होईल - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
वाघ मित्रांना प्रशिक्षण : भारत सरकारने पहिल्या टप्प्यात पाच वाघांच्या हस्तांतरणास परवानगी दिली आहे. त्यानुसार आज या वाघिणीला नवेगाव-नागझिरा प्रकल्पात हलवण्यात आहे. या ठिकाणी 11 वाघ असून 20 वाघांची अधिवास क्षमता आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिरा हे वन्यजीवप्रेमी, अभ्यासक, पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. नवेगाव नागझिरा प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 400 स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले असून 100 व्याघ्रमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाघ मित्रांना दोन हजार रुपये मानधन दिले जाते. पर्यटकांसाठी सहा अत्याधुनिक वाहने देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
25 वाघांना हलवणार : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) राज्याच्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पसरलेले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केला की, राज्यातील वाघांचे हे पहिले स्थलांतरण आहे. या "कार्यक्रमांतर्गत, मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी सुमारे 25 वाघांना चंद्रपूर जिल्ह्यातून राज्यातील इतर ठिकाणी स्थलांतरित केले जाईल," असे मुगनंटीवर म्हणाले. वनविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चंद्रपुरात नुकत्याच दोन वाघिणींना पकडण्यात आले होते.
2022 मध्ये हल्ल्यात 53 जणांचा मृत्यू : "या वाघिणींची नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यापूर्वी वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) च्या तज्ञांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. " तज्ञांच्या पथकाने सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत आठ जणांचा वाघाने तर दोन जणांचा बिबट्याने ठार केले आहे. वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये जिल्ह्यात वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात एकूण 53 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
वाघिणींचे व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतर : चंद्रपूरमधील मानव-प्राणी संघर्षाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी काही वाघांचे चंद्रपूरहून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतर करण्यास मान्यता देण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) गैर-उपद्रवयुक्त वाघ, वाघिणींचे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतर करण्यास मान्यता दिली होती, असे वन अधिकाऱ्याने सांगितले.
विदर्भ ही जगाची व्याघ्र राजधानी : जगात 193 देश आहेत त्यापैकी फक्त 14 देशांमध्ये वाघ आहेत. या 14 देशांपैकी भारतात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. 65 टक्के वाघ भारतात आहेत. त्यातले बहुतांश विदर्भात आहेत हे विदर्भाचे वेगळेपण आहे. याचा अर्थ विदर्भ ही जगाची व्याघ्र राजधानी बनली आहे. नागझीराचे पर्यटन वाढविण्यासाठी दोन वाघिणींना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा -