ETV Bharat / state

दोन भावांनी सख्ख्या भावाला डीझल टाकून जाळले; चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील घटना - two brothers burnt elder brother korpana

गडचांदूर येथील मुक्तीधाम परिसरात मुनेश्वर कुटुंब राहते. तिघे भाऊ रवी, अमृत आणि जयदेव हे याच परिसरात आजूबाजूला राहतात. 24 ऑक्टोबरला सकाळी लहान मुलांच्या कारणावरून आरोपी दोन लहान भाऊ अमृत आणि रोहिदास ह्यांच्या बायकांचा मोठा भाऊ जयदेव याच्या बायकोसोबत वाद झाला.

two brothers burnt elder brother korpana chandrapur
दोन भावांनी सख्या भावाला डीझल टाकून जाळले
author img

By

Published : Oct 26, 2021, 10:42 PM IST

चंद्रपूर - लहान मुलांवरून झालेल्या वादात दोन लहान भावांनी आपल्या सख्या मोठ्या भावाला डीझल टाकून जाळल्याची घटना घडली. ही घटना 24 ऑक्टोबरला कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे घडली. यात मोठा भाऊ जयदेव मुनेश्वर गंभीर जखमी झाला. यानंतर जखमीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

मोठ्या भावाच्या बायकोसोबत वाद -

गडचांदूर येथील मुक्तीधाम परिसरात मुनेश्वर कुटुंब राहते. तिघे भाऊ रवी, अमृत आणि जयदेव हे याच परिसरात आजूबाजूला राहतात. 24 ऑक्टोबरला सकाळी लहान मुलांच्या कारणावरून आरोपी दोन लहान भाऊ अमृत आणि रोहिदास ह्यांच्या बायकांचा मोठा भाऊ जयदेव याच्या बायकोसोबत वाद झाला. त्यावेळी जयदेव शेतात गेला होता.

हेही वाचा - चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या हास्य कलाकाराची महाराष्ट्राला गरज - प्रदीप देशमुख

हा वाद इतक्या विकोपाला गेला की मोठा भाऊ शेतातून परत आल्यानंतर दोन सख्या लहान भावांनी मोठ्या भावाच्या अंगावर डीझल टाकून त्याला जाळले. यात जयदेव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच, दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. कलम 307 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील उपविभागीय पोलीस अधीक्षक सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यजित करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.