ETV Bharat / state

पोंभुर्ण्यात गिट्टीने भरलेला भरधाव ट्रक घरात घुसला; दोन जण चिरडले - pobhurna truck accident

ड्रायव्हरला डुलकी लागल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ते सोनटक्के यांच्या घरात शिरले. त्यामुळे पहिल्या खोलीत झोपलेले तिवाडे आणि झगडकर हे ट्रक खाली चिरडल्या गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

chandrapur
हायवा ट्रक घरात शिरल्याचे दृश्य
author img

By

Published : Jan 26, 2020, 11:19 AM IST

चंद्रपूर- गिट्टी भरलेला हायवा ट्रक घरात शिरल्याने घरात खाटेवर झोपून असलेल्या दोघांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणा येथे सकाळी ५ वाजता घडली. उमाजी तिवाडे (वय.४०), देविदास वासूदेव झगडकर (वय.४५) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेने गावकरी संतापले असून त्यांनी रास्तारोको केला आहे.

हायवा ट्रक घरात शिरल्याचे दृश्य

शेतीच्या कामानिमित्ताने देविदास झगडकर आणि उमाजी तिमाडे हे चेकठाणा येथे आले होते. उशीर झाल्याने ते चेकठाणा येथील त्यांचे नातेवाईक सोनटक्के यांच्या घरी झोपले. सोनटक्के यांचे घर बसस्थानक परिसरात आहे. दरम्यान सोनटक्के यांच्या घरातील पहील्या खोलीत झगडकर आणि तिवाडे झोपले. तर दुसऱ्या खोलीत सोनटक्के यांचे कुटुंब झोपले होते. दरम्यान, पाच वाजता नंदोरी येथून गिट्टीने भरलेला भरधाव हायवा ट्रक विठ्ठलवाड्याकडे निघाला होता. ड्रायव्हरला डुलकी लागल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ते सोनटक्के यांच्या घरात शिरले. त्यामुळे पहिल्या खोलीत झोपलेले तिवाडे आणि झगडकर हे ट्रक खाली चिरडल्या गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटस्थळ गाठले आहे.

हेही वाचा- चंद्रपूर महापालिकेला प्रजासत्ताक दिनी संविधान निर्मात्याचाच विसर

Intro:प्रजासत्ताक दिनाची गोड झोप त्यांचासाठी शेवटची ठरली; हायवा घरात शिरला;दोघांना चिरडले

चंद्रपूर

गिट्टी भरलेला हायवा घरात शिरला. घरात खाटेवर झोपुन असलेल्या दोघांना हायवाने चिरडले.यात दोघांचा घटस्थळीच मृत्यू झाला. ही घटना पोंभुर्णा तालूक्यातील चेकठाणा येथे सकाळी पाच वाजता घडली. उमाजी तिवाडे ( वय ४० ),देविदास वासूदेव झगडकर ( ४५ ) असे मृतकांची नावे आहेत. या घटनेने गावकरी संतापले असून त्यांनी रास्तारोको केला आहे. आरोपीचा शोध पोंभुर्णा,बेंबाळ पोलीस घेत आहेत.

मित्रासोबत सहभोजन घेऊन ते दोघे झोपी गेले. स्वप्नांचा गोड दूनियेत मन हरविले असतांनाच काळाने झडप घातली. साखरझोपेतच दोघांचा दूदैवी मृत्यू झाला. ही घटना पोंभुर्णा तालूक्यातील चेकठाणा येथे घडली. शेतीचा कामानित्याने देविदास झगडकर,उमाजी तिमाडे हे चेकठाणा येथे आले होते. उशिर झाल्याने ते चेकठाणा येथिल नातेवाईक सोनटक्के यांच्या घरी झोपी गेले होते. सोनटक्के यांचे घर बसस्थानक परिसरात आहे. दोघांनी सोनटक्के परिवारासोबत सहभोजन घेतले अन झोपी गेले. पहील्या खोलीत झगडकर आणि तिवाडे झोपले होते. तर दूसर्या खोलीत सोनटक्के यांचे कुटूंब झोपले होते. दरम्यान पाच वाजता नंदोरी येथून गिट्टीने भरलेला भरधाव हायवा विठ्ठलवाडाकडे निघाला होता. ड्राव्हरला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सूटले. अन सोनटक्के यांचा घरातच हायवा शिरला. या अपघातात झगडकर,तिवाडे यांचा घटस्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहीती होताच गावकरी रस्तावर आले.पोलीसांना माहीती देण्यात आली.पोलीसांनी घटस्थळ गाठले आहे.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.