ETV Bharat / state

चंद्रपूर : 'या' ऐतिहासिक ठिकाणी हजारो आंबेडकर अनुयायी आजही एकत्र येतात - तारसा बुजरुक

स्वातंत्र्यपुर्व काळात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील देवाजी बापू खोब्रागडे हे वनविभागातील मोठे कंत्राटदार होते. विभाजनपूर्व चंद्रपूर जिल्ह्यातील अहेरी वनक्षेत्रातील तोडलेली लाकडे तारसा बुजरुकला आणली जायची. तारसा बुजरुक येथील वैनगंगेच्या काठावर लाकुड डेपो उभारण्यात आला होता. या डेपोवर गोंडपिपरी तालुक्यातील मजूर कार्यरत होते.

pole
गोंडपिपरी तालूक्यातील तारसा बुजरुक या गावातील ऐतिहासिक स्मृतीस्तंभ
author img

By

Published : Dec 6, 2019, 11:19 AM IST

चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुजरुक या गावात एक ऐतिहासिक स्मृतिस्तंभ उभा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची बातमी रेडिओवर ऐकताच वैनगंगेच्या काठी काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक लाकडी खांब उभा केला. त्यावर निळा झेंडा फडकवून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. त्या लाकडी खांबाशेजारीच आज एक भला मोठा स्तंभ आहे. 6 डिसेंबरला परिसरातील हजारो अनुयायी याठिकाणी एकत्र येऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतात.

गोंडपिपरी तालूक्यातील तारसा बुजरुक या गावात एक ऐतिहासिक स्मृतीस्तंभ आहे

स्वातंत्र्यपुर्व काळात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील देवाजी बापू खोब्रागडे हे वनविभागातील मोठे कंत्राटदार होते. विभाजनपूर्व चंद्रपूर जिल्ह्यातील अहेरी वनक्षेत्रातील तोडलेली लाकडे तारसा बुजरुकला आणली जायची. तारसा बुजरुक येथील वैनगंगेच्या काठावर लाकुड डेपो उभारण्यात आला होता. या डेपोवर गोंडपिपरी तालुक्यातील मजूर कार्यरत होते.

हेही वाचा - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला लाखोंचा जनसागर

देवाजी खोब्रागडे हे बाबासाहेबांचा विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते. फावल्या वेळात मजूरांना ते बाबांसाहेबांच्या कार्याची, विचारांची माहीती देत असत. लिंगाची कातकर, पत्रु पाटील खोब्रागडे, गोवर्धन देवतळे, लूलाराम फुलझले, संपत उराडे, तूळीराम भसारकर यांसारखे सच्चे कार्यकर्ते खोब्रागडे यांनी घडवले. बाबासाहेबांची निधनवार्ता मिळताच सर्व कार्यकर्ते एकत्र आले. लाकुड डेपो असलेल्या परिसरात लाकडी खांब उभा करण्यात आला. त्या खांबावर निळा झेंडा फडकवला गेला होता. 'बाबासाहेब अमर रहे' च्या घोषणा देत या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना श्रध्दांजली अर्पण केली होती.

Intro:स्वातंत्र्यपुर्व काळातील चळवळीचा या प्रमुख ठिकाणी वाहीली बाबासाहेबांना श्रध्दांजली;दरवर्षी हजारो बाबांची लेकरे येथे देतात भेट

चंद्रपूर

6 डिसेबंर 1956 हा काळा दिवस उजाळला. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानाची बातमी रेडीओवर धडकत होती. आंबेडकरी समाज दूखात बुडाला होता. विभाजनपुर्व गोंडपिपरी तालूक्यातील तारसा बुजरुक येथिल वैणगंगेचा काठी कार्यकर्ते एकत्र आले. त्या कार्यकर्त्यांनी तिथे लाकडी खांब उभा केला. त्या खांबावर निळा झेंडा फडकळत होता. बाबासाहेब अमर रहे..या घोषणा देत त्यांनी बाबासाहेबांना श्रध्दांजली वाहली. आज तेथे प्रशस्त स्मृतीस्थंभ उभा आहे. जिल्ह्यातील हजारो अनुयायी दरवर्षी सहा डिसेंबरला स्थंभाजवळ श्रध्दांजली वाहण्यासाठी कानोकोपर्यातून येथे येतात. स्वातंत्र्यपुर्व काळात चळवळीचे प्रमुख ठिकाण असलेले ते स्थळ आज उर्जाकेंद्र बनले आहे.

स्वातंत्र्यपुर्व काळात बॕरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील देवाजी बापू खोब्रागडे हे वनविभागातील मोठे कंत्राटदार होते. विभाजनपुर्व चंद्रपूर जिल्ह्यातील अहेरी वनक्षेत्रातील तोडलेली लाकडे तारसा बुजरुकला आनले जायचे. गोंडपिपरी तालूक्यातील तारसा बुजरुक येथिल वैणगंगेचा काठावर लाकुड डेपो उभारण्यात आला होता. या डेपोवर विभाजपुर्व गोंडपिपरी तालूक्यातील मजूर कार्यरत होते. देवाजी खोब्रागडे हे बाबासाहेबांचा विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते.फावल्या वेळात मजूरांना ते बाबांसाहेबांच्या कार्याची,विचारांची माहीती देत असत. लिंगाची कातकर तारसा,पत्रु पाटील खोब्रागडे गोवर्धन , सूदाम देवतळे नांदगाव,
लूलाराम फुलझले पोंभुर्णा,संपत उराडे बेंबाड,तूळीराम भसारकर बोरगाव यासारखे सच्चे कार्यकर्ते खोब्रागडे यांनी घडविले. खोब्रागडे यांच्या ममार्गदर्शनात गावागावात भेट देऊन शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापणा कार्यकर्ते करित होते. वैणगंगेचा काठी असलेले लाकुड डेपो चळवळीचे मुख्य केंद्र बनले होते.अश्यात
6 डिसेंबर 1956 हा काळा दिवस उजळला. बाबासाहेबांचा महापरिनिर्वानाची बातमी रेडीओवर धडकत होती.बाबासाहेब गेलेत हे ऐकताच गावागावात शोककळा पसरली होती. बाबासाहेबांचे कार्यकर्ते दूखाने आक्रंदत होते. चळवळ दूखाचा खोल सागरात बुडाली होती. लाकुड डेपोत असलेल्या मजूरांचा दूखाला सिमा उरली नव्हती. विभाजन पुर्व गोंडपिपरी तालूक्यातील कार्यकर्ते लाकुड डेपोकडे धाव घेत होते. एकमेकांना बिलगुन ओक्साबोक्सी अश्रू ढाळीत होते.
सर्व कार्यकर्ते एकत्र आले. लाकुड डेपो असलेल्या परिसरात लाकडी खांब उभा करण्यात आला. त्या खांबावर निळा झेंडा फडकविला गेला. बाबासाहेब अमर रहे अश्या घोषणा देत बाबासाहेबांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्या ठिकाणी आज प्रशस्त स्मृतीस्तंभ उभारण्यात आला आहे.चंद्रपूर,गडचीरोली जिल्ह्यातील बौध्दबांधव दरवर्षी महापरिनिर्वान दिनी येथे एकत्र येवून श्रध्दांजली अर्पण करतात. भिमसैनिंकासाठी तारसा बुजरुक येथिल स्मृतीस्तंभ उर्जाकेंद्र बनले आहे.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.