चंद्रपूर - घुग्घुस - वणी राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला ( Accident Ghugus Wani Highway In Chandrapur ) आहे. या अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला ( Chandrapur Accident Two Killed ) आहे. तर, तीन जण गंभीर जखमी ( Chandrapur Accident Three Injured ) झाले. ही घटना राज्य महामार्ग क्रमांक सात वरील पुनवट गावाजवळ चार वाजता घडली आहे.
महादेव बालवटकर ( बेलोरा ), राजू मिलमिले ( मारेगाव ) असे मृतकांची नावे आहेत. सुरेश जूनघरी, सतीश गेडाम आणि एक मजूर गंभीररीत्या जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घुस - वणी मार्गावर आयव्हीआरसीएल (IVRCL) या कंपनीच्या माध्यमातून मार्गाच्या डागडुजीचे काम सुरु आहे. घुग्घुस - वणी राज्य महामार्ग क्रमांक सातवरील पुनवट गावाजवळ कंपनीचे मजूर डागडुजीच्या कामात व्यस्त होते. त्यातच वणी येथून येणाऱ्या भरधाव ट्रकने ( MH 31 FC6399 ) पाच मजूरांना चिरडले. त्यामध्ये बेलोरा आणि मारेगाव येथील मजूराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, तीन मजूर गंभीररीत्या जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच वणी तालुक्यातील सिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन तरवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांत या मार्गावर लहान मोठे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.
हेही वाचा - Devendra Fadnavis : 'मुख्यमंत्री ठाकरे आणि माझ्या बायकोत एकच साम्य...'; फडणवीसांचे मिश्कील उत्तर