चंद्रपूर- जिल्ह्यातील मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या लाठी वनक्षेत्रात मृतावस्थेत वाघ आढळून आला. त्यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली. धाबा वनक्षेत्रात मृता अवस्थेत वाघ आढळून येण्याची ही दूसरी घटना आहे.
मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या लाठी गावाजवळ असलेल्या नाल्यातील पात्रात मृतअवस्थेत वाघ आढळून आला आहे. दोन महिण्यापूर्वी पोडसा शेतशिवारात वाघीन मृतवस्थेत आढळून आली होती. अवघ्या दोन महिण्यात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने वनविभागात खळबळ माजली आहे. दरम्यान, वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठल्याची माहिती आहे. वाघाच्या मृत्यूबाबत वन विभागाकडून गुप्तता बाळगली जात आहे.
हेही वाचा- चंद्रपुरात उद्देशिका वाचून संविधान दिन साजरा