ETV Bharat / state

ताडोबात चवताळलेल्या वाघाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर केला हल्ला, जीव वाचवण्यासाठी वाघाशी झटापट - ताडोबा वाघ हल्ला

मागील 2-3 दिवसापासून प्रकल्पाचे पथक या वाघावर पाळत ठेवून होते. आज (गुरुवारी) सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान वाघाची प्रत्यक्ष स्थिती बघण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पथक गेले असता वाघाने अचानक हल्ला चढवला. स्वतःचा बचाव करताना खोब्रागडे खाली पडले. तेव्हा वाघाने त्यांचे दोन्ही पाय पकडले. तोंडाने एका पायावर हल्ला चढविला तर दुसरा पाय त्याने पंजामध्ये पकडला. पायात मजबुत बूट असताना देखील जबड्यात बोटे सापडल्याने एक बोट तुटले तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

वाघाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर केला हल्ला

author img

By

Published : Jun 3, 2021, 3:54 PM IST

Updated : Jun 3, 2021, 4:38 PM IST

चंद्रपूर - गस्तीवर असताना निपचित पडून असलेल्या वाघाने विशेष पथकावर अचानक हल्ला चढवला. यात पशुवैद्यकीय अधिकारी जखमी झाले आहे. रवी खोब्रागडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या दोन्ही पायाची बोटे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

असा झाला हल्ला

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात असणाऱ्या वाघ आणि बिबट हे संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यास अशा प्राण्यांवर पाळत ठेवण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील डोनी गावालगतच्या जंगलात एक वाघ निपचित अवस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली. मागील 2-3 दिवसापासून प्रकल्पाचे पथक या वाघावर पाळत ठेवून होते. आज (गुरुवारी) सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान वाघाची प्रत्यक्ष स्थिती बघण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पथक गेले असता वाघाने अचानक हल्ला चढवला. स्वतःचा बचाव करताना खोब्रागडे खाली पडले. तेव्हा वाघाने त्यांचे दोन्ही पाय पकडले. तोंडाने एका पायावर हल्ला चढविला तर दुसरा पाय त्याने पंजामध्ये पकडला. पायात मजबुत बूट असताना देखील जबड्यात बोटे सापडल्याने एक बोट तुटले तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सोबतच्या लोकांनी जोरदार आरडाओरडा केल्यावर वाघाने पळ काढला. दरम्यान, जखमी डॉक्टरला शस्त्रक्रियेसाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे. या घटनेला ताडोबा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा-१२ वीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय थोड्याचवेळात, मुख्यमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापनाची बैठक सुरू

Last Updated : Jun 3, 2021, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.