चंद्रपूर - विटा खाली करुन परतताना मेटॅडोर नाल्यात कोसळून तीन मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नोकारी पुलावर घडली. जखमींना उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बल्हारपूर-विसापूर येथील विटा घेवून जिवतीला मेटॅडोर गेला होता. विटा खाली करुन परतताना गडचांदूरपासून दहा किमी अंतरावर असलेल्या नोकारी पुलावरुन मेटॅडोर नाल्यात कोसळला. यात चालक व दोन मजूर गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने मेटॅडोरखाली दबलेल्या सुनील गेडाम (38), अनिल गेडाम (40), व संतोष कोवे (32) यांना बाहेर काढले. उपचारासाठी जखमींना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस करत आहेत.
मेटॅडोर कोसळला नाल्यात; तीन मजूर गंभीर जखमी - मेटॅडोर
विटा खाली करुन परतताना गडचांदूरपासून दहा किमी अंतरावर असलेल्या नोकारी पुलावरुन मेटॅडोर नाल्यात कोसळला. यात चालक व दोन मजूर गंभीर जखमी झाले.
![मेटॅडोर कोसळला नाल्यात; तीन मजूर गंभीर जखमी Meta](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6850816-127-6850816-1587268666787.jpg?imwidth=3840)