ETV Bharat / state

Tadoba Andhari Tiger Project : व्याघ्रसफारीचा देशातील एकमेव प्रयोग थंडबस्त्यात; प्रादेशिक वनविभागाच्या तीन सफारी सध्या बंद - व्याघ्रसफारीचा देशातील एकमेव प्रयोग थंडबस्त्यात

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाव्यतिरिक्त ( Tadoba Andhari Tiger Project ) दोन वर्षांपूर्वी प्रादेशिक वनविभागात व्याघ्र सफारी उपक्रम सुरू ( Tiger Safari activities started ) करण्यात आला. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांच्या डागडुजी अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत ( Hermod of tourists ) आहे.

Tadoba Andhari Tiger Project
व्याघ्रसफारीचा देशातील एकमेव प्रयोग थंडबस्त्यात
author img

By

Published : Dec 14, 2022, 3:18 PM IST

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाव्यतिरिक्त ( Tadoba Andhari Tiger Project ) दोन वर्षांपूर्वी प्रादेशिक वनविभागात व्याघ्र सफारी उपक्रम सुरू ( Tiger Safari activities started ) करण्यात आला. प्रादेशिक वनविभागात केला जाणारा हा देशातील एकमेव प्रयोग होता. मात्र, ही सफारी सध्या थंडबस्त्यात गेली आहे. चार पैकी केवळ एकच ठिकाणी ही सफारी सुरू असून त्याला देखील थंड प्रतिसाद मिळत आहे, तर इतर ठिकाणी वनविभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांच्या डागडुजी अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत ( Hermod of tourists ) आहे.

स्थानिक रोजगाराला चालना : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा जगभरात प्रसिध्द आहे. ताडोबा म्हणजे हमखास वाघाचे दर्शन असे समीकरण आता झाले आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांचा ओघ हा ताडोबाकडे असतो. याचा परिणाम म्हणजे ताडोबाची बुकिंग ही नेहमी हाऊसफुल असते. त्यामुळे ताडोबाची एक बुकिंग करण्यासाठी महिनोंमहिने पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागते. शिवाय ही सफारी खर्चिक असल्याने सामान्य नागरिकांना परवडण्यासारखी नाही. शिवाय जितके वाघ हे ताडोबा प्रकल्पात आहे तेवढेच वाघ त्याच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात आहे. त्यामुळे ताडोबाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, पर्यटकांना सुविधा व्हावी या उद्देशाने प्रादेशिक वनविभागाकडून सफारी सुरू करण्यात आली. 26 जानेवारी 2021 ला तत्कालीन मुख्य वनसंरक्षक एन. प्रवीण यांच्या हस्ते कारवा-बल्लारपूर सफारी सुरू करण्यात आली. त्यानंतर चोरा-तिरवंजा, जोगापूर आणि पोंभुरणा या ठिकाणी या ठिकाणी टप्याटप्याने ही सफारी सुरू करण्यात आली. पर्यटकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कारण पहिल्या दिवशीपासूनच या ठिकाणी वाघाचे दर्शन पर्यटकांना व्हायला लागले. सोबत स्थानिकांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात आले त्यामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळाली.

का झाली प्रादेशिक वनविभागाची सफारी प्रसिद्ध : ताडोबा सीमेच्या लगत असलेल्या या परिसरात वाघांची मोठी संख्या आहे. मात्र येथे सफारीसाठी जिप्सी करण्याची गरज नाही. आपल्या चारचाकी वाहनाने देखील ही सफारी करता येऊ शकते. यासाठी केवळ 600 रुपये शुल्क ठेवण्यात आले, तर ताडोबात एक जिप्सीसाठी 5 हजार 500 रुपये मोजावे लागतात. एक गाईडसाठी 400 रुपये मोजून ही सफारी करता येते. सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळी ही सफारी करता येते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक यायचे, मात्र आता ही सफारी बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

का आहे सफारी बंद : दरवर्षी पावसात कच्चे रस्ते वाहून जातात किंवा खराब होतात. त्यामुळे पावसाळा गेल्यानंतर याची डागडुजी केली जाते. या वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, अनेक रस्ते वाहून गेले, खराब झाले, त्याची डागडुजीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यावर वाहन चालू शकत नाही त्यामुळे ही सफारी आता बंद आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष आणि डागडुजीची प्रतीक्षा : खरं तर प्रादेशिक सफारीची स्पर्धा ही ताडोबाशी व्हायला हवी तरच या सफारीचे महत्व आणि अर्थकारण जीवित राहील. दरवर्षी 1 ऑक्टोबरला ताडोबाची सफारी सुरू होते. त्याच काळात प्रादेशिक वनविभागाची सफारी सुरू होणे आवश्यक आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत ताडोबातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. याच धर्तीवर प्रादेशिक वनविभागाच्या रस्त्यांचीही दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. मात्र दोन महिने लोटूनही तीन सफारीच्या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. यामध्ये कारवा-बल्लारपूर, जोगापूर आणि पोंभुरणा या सफारीचा समावेश आहे. तर चोरा-तिरवंजा या ठिकाणी रस्त्याची डागडुजी करून 2 डिसेंबरपासून सफारी सुरू करण्यात आली मात्र आत्तापर्यंत केवळ 13 वाहनेच या ठिकाणी आली. वनविभागाने वेळीच लक्ष देऊन तातडीने लक्ष दिले असते तर आज ही सफारी सुरू झाली असती.

पावसाने अडथळा, प्रस्ताव पाठवला : भोवरे यंदा अतिवृष्टीमुळे जंगलातील अनेक रस्ते वाहून गेलेत, त्यामुळे गस्त घालणे कठीण झाले आहे, रस्ते दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव वरीष्ठ विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तो मंजूर होताच त्याचे काम सुरू होईल अशी प्रतिक्रिया कारवा-बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.