चंद्रपूर - जिल्ह्यात तेंदू पाने तोडण्याचा हंगाम सुरू होताच मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. बुधवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या जंगलात तीन ग्रामस्थांचा मृत्यू झालाय. तर एका चौथ्या घटनेत शोध मोहिमेवर असलेल्या वनरक्षकावर वाघाने हल्ला केला आहे. यात हा वनरक्षक जखमी झाला आहे. तेंदूपाने तोडण्याच्या हंगामा दरम्यान जंगलात एकट्याने फिरू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
पहिली घटना सिंदेवाही तालुक्यात पेंढरी परिसरातील दिवाण तलाव भागात घडली आहे. तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला केला. यात सीताबाई गुलाब चौके (वय 55) या महिलेचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत भद्रावती आयुध निर्माणी जंगल भागातील चिपराळा बीट जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या रजनी भालेराव नामक 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या घटनेत सावली तालुक्यातील पाथरीच्या जंगलात रामा मारबते नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गुरे चराईसाठी गेलेल्या वृद्धावर वाघाने हल्ला केला. हा व्यक्ती निफन्द्रा गावातील रहिवासी होता. तर चौथ्या घटनेत सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ मृत्युमुखी पडत असताना शोध मोहिमेवर असलेल्या वनपथकावर वाघाने हल्ला केला. यात वनरक्षक संदीप चुधरी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष हा चिंतेचा विषय ठरत आहे.
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एकाच दिवशी तीन ठार - वाघाचा हल्ला
तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला केला. यात सीताबाई गुलाब चौके (वय 55) या महिलेचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत भद्रावती आयुध निर्माणी जंगल भागातील चिपराळा बीट जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या रजनी भालेराव नामक 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या घटनेत सावली तालुक्यातील पाथरीच्या जंगलात रामा मारबते नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.