ETV Bharat / state

चंद्रपूर : लसीचे दोन डोज घ्या आणि 15 टक्के सूट मिळवा; शासकीय नव्हे, तर दाभेली विक्रेत्याचा उपक्रम - चंद्रपूर दाभेली 15 टक्के सुट बातमी

चंद्रपुरातील एका दाभेली विक्रेत्यांना अनोखा उपक्रम सुरु केला आहे. लसीकरणाचे दोन डोज पूर्ण झालेल्या ग्राहकांना 15 टक्के सुट देण्यात येत आहे. तसेच ज्यांनी रक्तदान केले. त्यांना रक्तदान केल्याच्या दिवशी मोफत दाभेली देण्याची सुविधाही करण्यात आली आहे.

chandrapur
chandrapur
author img

By

Published : Sep 27, 2021, 10:50 AM IST

चंद्रपूर - कोरोना लसीकरणासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. अशात चंद्रपुरातील एका दाभेली विक्रेत्यांना अनोखा उपक्रम सुरु केला आहे. लसीकरणाचे दोन डोज पूर्ण झालेल्या ग्राहकांना 15 टक्के सुट देण्यात येत आहे. तसेच ज्यांनी रक्तदान केले. त्यांना रक्तदान केल्याच्या दिवशी मोफत दाभेली देण्याची सुविधाही करण्यात आली आहे.

लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम -

लोकांनी कोरोना लस घ्यावी, यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. कुठे उपक्रम राबवावे लागत आहेत, तर कुठे जनजागृती करावी लागत आहे. चंद्रपुरात एका दाबेली विक्रेत्याने तर अनोखी शक्कल लढवून लशीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ज्याने कोरोना लसीचे दोन डोज घेतले. त्यांना दाबेलीच्या किंमतीत 15 टक्क्यांची सूट दिली आहे. एवढेच नाही, तर रक्तदात्यांना मोफत दाभेली देण्याचा उपक्रम लक्ष्मी दाभेली सेंटरने सुरू केला आहे. हे दाभेली उपहारगृह शहा दाम्पत्य चालवते. चंद्रपूरच्या श्रीकृष्ण टॉकीजलगत त्यांचे छोटेसे दुकान आहे. आर्थिक स्थिती जेमतेम असली, तरी लोकांच्या भल्यासाठी आपणही काही केले पाहिजे आणि सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावला पाहिजे, या विचाराने त्यांनी हा अनोखा प्रयोग सुरू केला आहे. प्रलोभनातून प्रोत्साहन, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे आणि त्यांना नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद; जाणून घ्या 'त्या' तिन्ही कृषी कायद्यांविषयी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.