ETV Bharat / state

Indian Independence Day : चिमुर क्रांतीत 21 क्रांतिकारकांना फाशी; वाचा चिमुर क्रांतीचा रक्तरंजीत इतिहास - चिमूर क्रांती

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीच (before the country gained independence) स्वतंत्र झाले होते हे चिमुर (This place became independent ) वाचा या क्रांतीचा इतिहास (Read History of Chimur Revolution) देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले मात्र, त्या पुर्वी पाच वर्षांपूर्वीच काही दिवसच का होईना पण चिमुर स्वतंत्र (Chimur Revolution) झाले होते. यासाठी 21 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा तर 26 जणांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागली होती.

Chimur Revolution
चिमूर क्रांती
author img

By

Published : Aug 8, 2022, 7:32 PM IST

Updated : Aug 9, 2022, 12:54 PM IST

चंद्रपूर: देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले आणि आज त्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पाच वर्षांपूर्वीच (before the country gained independence) म्हणजे 1942 मध्येच काही दिवसच का होईना पण स्वतंत्र झाले होते,(This place became independent ) असे एक ठिकाण आहे. यासाठी 21 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा तर 26 जणांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली होती. मात्र, तरीदेखील या असाधारण क्रांतीची दखल देशाच्या इतिहासाने अद्यापही पाहिजे तशी घेतलेली नाही पाहुया चिमुर क्रांतीचा इतिहास (Read History of Chimur Revolution) काय आहे.

गांधीजींचा 'करो या मरो' चा नारा: 8 ऑगस्ट 1942 ला ग्वालिया टँक मैदान, मुंबई येथे महात्मा गांधी यांनी 'भारत छोडो' आंदोलनाच्या माध्यमातून 'करो या मरो' चा नारा दिला. यानंतर गांधीजींच्या संदेशाने सारा देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील चिमूर येथे 12 ऑगस्ट पासूनच काहीतरी मोठं घडवून आणण्यासाठी गुप्त बैठका सुरु होत्या. आणि यामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भक्कम प्रेरणा होती. त्यांच्या "गुलामी अब नही होना, हमारे प्रिय भारत देश में", " पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना" या प्रकारच्या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या भजनाने लोकांच्या मनात क्रांतीची ठिणगी यापूर्वीच पडली होती.

तो दिवस उजाडला : मात्र, त्याचा स्फोट व्हायचा होता.अखेर, स्वातंत्र्याचा तो दिवस उजाडला. 16 ऑगस्टच्या सकाळी एक मोठी प्रभातफेरी चिमूर येथे काढण्यात आली. ज्याचे नेतृत्व गोपाळराव कोरेकार करीत होते. "व्हाईसराय दिल्ली में, जुते खाये गल्ली में", या घोषणा देत ही प्रभातफेरी जुन्या बसस्थानकाकडून नाग मंदिराकडे निघाली. कारण, त्यादिवशी नागपंचमीचा दिवस होता. या मोर्चात काँग्रेस सेवादलाचे श्रीराम बिगेवार, सखाराम माट्टेवार, बाबूलाल झिरे, दादाजी किरीमर, मारुती खोबरे, गणपत खेडकर आदी क्रांतिकारक सहभागी झाले होते.

भ्यंकर मैदानावर मोठी गर्दी : यानंतर सेवादलाचे उद्धवराव खेमसकर यांचे नेतृत्वात अभ्यंकर मैदानावर मोठी गर्दी जमा झाली होती. अनेकांच्या हातात यावेळी तिरंगा होता आणि ते भारत माता की जय अशा घोषणा देत होते. त्याचवेळी पोलीस दलाने त्यांच्या हातातील तिरंगा हिसकावला आणि बारा क्रांतिकारकांना तुरुंगात डांबले. यावेळी इंग्रजांकडून गोळीबारही करण्यात आला होता. यामुळेच रक्तरंजित क्रांतीची ठिणगी पेटली. आंदोलनकर्त्यांनी इंग्रजांच्या चार अधिकाऱ्यांना पूर्वीचे डाकघर आणि आताचे विश्रामगृह येथे डांबले आणि अख्खे डाकघरच पेटवून दिले.

चिमूर हे स्वतंत्र झाल्याची घोषणा: चारही अधिकारी तिथेच मरण पावले. तर उरलेल्या शिपायांना शहरातील लोहापुल येथपर्यंत आणून पिटाळून लावण्यात आले. यामध्ये यानंतर 16, 17 आणि 18 ऑगस्ट या तिन्ही दिवशी इंग्रज सरकारचा चिमूर येथे कुठलाही मागमूस नव्हता. चिमूर हे स्वतंत्र झाले याची घोषणा खुद्द सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीच्या बर्लिन रेडिओ स्टेशन वरून केली. यानंतर केंद्र सरकारने येथे लष्कर पाठवून हे आंदोलन मोडून काढले. मात्र, चिमूर हे देशातील पहिले असे ठिकाण आहे. जे देशाच्या पूर्वी काही दिवस का होईना स्वतंत्र झाले.

21 क्रांतिकारकांना फाशी : बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार, बाबूलाल झिरे यांनी या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. या प्रकरणात इंग्रज सरकारने 200 जणांवर खटला चालविला. 21 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. तर, 26 जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. या क्रांतीला इतिहासात तोड नाही. मात्र, आजही हा इतिहास कुणाला माहिती नाही. भारतीय इतिहासाच्या पुस्तकात त्याला पाहिजे तसे स्थान मिळाले नाही.शिक्षणाच्या कुठल्याही अभ्यासक्रमात हा इतिहास शिकविला जात नाही. काळाने सुवर्ण अक्षरात लिहिलेल्या या इतिहासाला अद्यापही उपेक्षाच आहे.

हेही वाचा : Har Ghar Tiranga : सोलापुरात भारतीय तिरंग्यांसह देशविदेशातील झेंडेही बनतात; मोठ्या प्रमाणात मागणी

Last Updated : Aug 9, 2022, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.