चंद्रपूर : राज्यपाल (Governor of Maharashtra) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आपल्या चौकटीत राहून काम करावे. महाराष्ट्राला कमी लेखण्याचे (They should not work to defame Maharashtra) काम त्यांनी करू नये. जर महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचा मावळा (If the mawla catches fire) पेटून उठला; तर तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसचे (Congress MP) खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला.
महाराष्ट्रातुन गुजराती, राजस्थानी लोक निघून गेलेत; तर महाराष्ट्रात काहीही उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. यावर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी प्रतिक्रिया देत, राज्यपालांना निर्वाणीचा इशारा दिला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, याचे भान राज्यपालांनी ठेवावे. आपण काय बोलतोय काय नाही याचे भान असू द्या. आपल्या जिभेवर ताबा असू द्या, राज्यपाल आहे म्हणजे काहीही बोलायचे हे योग्य नव्हे. पूर्वी हेच भाजपवाले म्हणायचे की राज्यपालांना कुठलेही घटनात्मक अधिकार नाहीत, हे शोभेचे पद आहे आणि त्याच पदाचा आज दुरुपयोग केला जातो आहे. मुख्यमंत्री होऊन ज्यांना उत्तराखंड राज्यात कोणी विचारत नाही. अशांना पुनर्वसन करून महाराष्ट्रात पाठवले जात आहे. जे उद्योगपती तयार केले ते महाराष्ट्र आणि मराठी माणसाने तयार केले. याचा माज आल्यासारखे वागू नये असे वक्तव्य देखील धानोरकर यांनी केले.