चंद्रपूर No Electricity : आपण सध्या भारतीय स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत आहोत. मात्र, तरीही देखील देशातील काही भाग विकासापासून कोसो दूर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1 हजार 653 शाळांपैकी 72 शाळांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. आदिवासी, दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात तब्बल 47 शाळा आहेत. या शाळात आत्तापर्यंत वीज पोहचलेली नाहीय. सर्वांचा शिक्षण मूलभूत अधिकार आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाची सुरूवात सरकारनं केलीय. मात्र, अतिदुर्गम भागात अभियानाचा उजेड पडलेला दिसत नाही.
72 शाळांमध्ये वीज नाही : सरकारनं 4 ऑगस्ट 2021 रोजी नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत एक योजना सुरू केली. त्याद्वारे मुलांच्या शिक्षण तसंच विकासासाठी काम करायचं होतं. या योजनेंतर्गत शाळांमधील पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण, शिक्षकांचा विकास, त्यांचे प्रशिक्षण याकडंही लक्ष दिलं जाणार होतं. मात्र 72 शाळांमध्ये वीज नसल्यानं आता याची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
इंटरनेट पासून शाळा कोसो दूर : जिल्ह्यात एकूण 1 हजार 653 शाळा आहेत. यात 963 प्राथमिक, 572 माध्यमिक, तर 18 उच्च माध्यमिक शाळा आहेत. शासनातर्फे रोज कुठला ना कुठला अहवाल शिक्षकांकडून मागविण्यात योतो. अशातच आता ऑनलाइन हजेरीचा बडगा शासनानं उगारला आहे. परंतु, सरकारतर्फे अद्याप एकाही शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळं काम करायचं कसं हा मोठा प्रश्न आहे.
सर्व शिक्षा अभियानात हव्या 'या' गोष्टी :
|
---|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वीज पुरवठा नसलेल्या शाळा :
चंद्रपूर | 02 |
---|---|
वरोरा | 01 |
चिमूर | 01 |
नागभीड | 01 |
ब्रह्मपुरी | 01 |
सिंदेवाही | 01 |
सावली | 02 |
मूल | 03 |
पोंभुर्णा | 01 |
बल्लारपूर | 01 |
राजुरा | 10 |
कोरपना | 10 |
जिवती | 37 |
एकूण शाळा | 72 |
हेही वाचा -