ETV Bharat / state

Tiger Killed In Chandrapur : वाघाला करंट देऊन मारले, मग जमिनीत पुरले; चार आरोपी अटकेत

author img

By

Published : Dec 17, 2021, 1:15 AM IST

Updated : Dec 17, 2021, 12:41 PM IST

सावली वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र ( Tiger Killed In Chandrapur Sawali Forest ) असलेल्या पेंढरी येथे ही धक्कादायक घटना तीन महिन्यापुर्वी घडली. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर काल गुरुवारी पेंढरी येथील पांडुरंग मोना गेडाम याचा घरी धाड टाकली. या धाडीत पांडूरंग गेडामकडे वाघाचा मिश्या आढळून आल्यात. आरोपीची सखोल चौकशी केली असता घडलेली घटना उघडकीस आली.

Tiger Killed
वाघाला करंट देऊन मारले

चंद्रपूर - जिल्ह्यातील सावली वनक्षेत्रात ( Tiger Killed In Chandrapur Sawali Forest ) वाघाला करंट लावून ठार केल्यानंतर ( The Tiger Was Electrocuted ) संरक्षित वनात मृतदेहाला पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वनविभागाने चार आरोपींना अटक केली असून आरोपींकडून वाघाच्या मिशा जप्त करण्यात आल्या आहेत. पांडूरंग मोना गेडाम, हिराचंद मुखरू भोयर, रामदास बाबुराव शेरकी, मारोती पोचू गेडाम अशी आरोपींची नावे आहेत.

सावली वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र असलेल्या पेंढरी येथे ही धक्कादायक घटना तीन महिन्यापुर्वी घडली. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर काल गुरुवारी पेंढरी येथील पांडुरंग मोना गेडाम याचा घरी धाड टाकली. या धाडीत पांडूरंग गेडामकडे वाघाचा मिश्या आढळून आल्यात. आरोपीची सखोल चौकशी केली असता घडलेली घटना उघडकीस आली.

पेंढरी गावातील ( Pendhari Village ) हीराचंद मुखरू भोयर यांच्या शेतात अंदाजे तीन महिन्यापुर्वीवाघाला करंट लावून ठार केले. वाघाच्या शवाला संरक्षित वनातील कक्ष क्रमांक 1667 मध्ये पुरले. या घटनेने वनविभाग पुरते हादरले आहे. वाघांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रातील वाघ सूरक्षित नाही, असा सूर आता उमटत आहे. दरम्यान पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कांबळी करीत आहेत.

Last Updated : Dec 17, 2021, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.