ETV Bharat / state

चंद्रपुरात कोरोना रुग्णात वाढ; एकूण संख्या पोहचली १४८० वर

नागरीकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रिसुत्रीचा वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Mar 24, 2021, 7:31 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली. आज (बुधवार) जिल्ह्यात 276 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 109 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या एकूण रुग्णांची संख्या 1480 इतकी झाली आहे.

कोरोना रुग्णात वाढ
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 244 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 351 झाली आहे. सध्या 1480 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 59 हजार 894 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 27 हजार 916 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 413 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 374, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या 276 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 120, चंद्रपूर तालुका 29, बल्लारपूर 11, भद्रावती 18, ब्रम्हपुरी 12, नागभिड तीन,सिंदेवाही 14, मूल सात, सावली चार, पोंभुर्णा एक, राजूरा चार, वरोरा 40, कोरपना सात व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

त्रिसुत्रीचा नियमित वापर करण्याचे आवाहन

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यात आढळून येत आहेत. नागरीकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रिसुत्रीचा वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.