चंद्रपूर - 20 एप्रिलला जगातील सर्वात उष्ण शहराच्या यादीत ब्रम्हपुरी शहर पहिले तर चंद्रपूर शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रम्हपुरी शहराचे या दिवशीचे तापमान तब्बल 45.3 डिग्री तर चंद्रपूरचे 45.2 डिग्री होते.
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात सूर्य आग ओकत आहे. कधी नव्हे ते मार्च महिन्यात 44 डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. 50 वर्षांचा हा विक्रम यावर्षी तुटला. चंद्रपूर शहरात उन्हाळ्यात सूर्य नेहमीच आग ओकत असतो. येथे आजवर 48 डिग्री तापमानाची देखील नोंद झाली आहे. सामान्यतः एप्रिल महिन्यापासून उन्हात प्रचंड वाढ होते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मार्च महिन्यापासूनच चंद्रपूरचा पारा चढला असल्याचे दिसून आले. 31 मार्च रोजी तब्बल 44 डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. आता पुन्हा एकदा उन्हाने कहर करणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहर हे जगातील सर्वाधिक उष्ण शहर होते, त्यानंतर चंद्रपूर हे दुसऱ्या स्थानावर होते. तिसऱ्या क्रमांकाचे अकोला शहराचे तापमान हे 44.9 होते. त्यामुळे या दिवशी विदर्भातील या अनेक शहरांनी उष्णतेचा उच्चांक गाठला. त्यामुळे येणारे दिवस हे चिंतेचे असणार आहे.
हेही वाचा - Electricity Crisis : वीज थकबाकीदारांकडून वसूली करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय