ETV Bharat / state

Chandrapur Accident : वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; 31 जखमी, 8 गंभीर - वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात

नामकरणविधीसाठी गावकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाल्याने 31 जण जखमी झाले, यापैकी आठ जण गंभीर आहेत. ही घटना ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ घडली. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले.

accident
अपघात
author img

By

Published : Feb 6, 2023, 9:45 PM IST

चंद्रपूर - गंभीर रुग्णांना चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर इतरांवर ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चालकाचे नियंत्रण सुटले - प्राप्त माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे दोनाडकर कुटुंबातील नातेवाईकांचा नामकरण सोहळा होता. रणमोचन येथील दोनाडकर व आप्त परिवार हे मालवाहक टेम्पो वाहनाने कार्यक्रमाला जात असताना ब्रम्हपुरी येथे बारई तलावाजवळ चालकाने गाडी थांबवली तिथे महेश दिघोरे नामक दुसरा चालकाने गाडी हाती घेतली. ब्रम्हपुरी येथिल टिळक नगर दत्त मंदिराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्यामुळे गाडी उलटली. वेळीच घटनास्थळा जवळील रहिवाशांनी पलटी वाहनाला उभे करून जखमींना वाहनाबाहेर काढून उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत केली. त्यात 31 जण जखमी झाले असून महिला व बालकांचा यात समावेश आहे.

जखमींवर उपचार सुरू - सदर घटनेनंतर जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींवर ताबडतोब येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.खंडाळे, डॉ. पटले, डॉ नागमोती, डॉ कामडी व त्यांच्या चमुनी प्रथमोपचार करून यातील गंभीर जखमींना रुग्णवाहिकेने गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.