ETV Bharat / state

संतापजनक! पायाचा आवाज केला म्हणून 38 विद्यार्थिनींना 200 उठाबशांची शिक्षा - विद्यार्थ्यांना शिक्षा

मुख्याध्यापिकेने तुमचे प्रात्याक्षिक घेणार नाही. तुम्हाला शुन्य मार्क देईन, असे मुलींना सांगितले. तर एवढ्यावरच न थांबता प्रत्येक वर्ग खोल्यात नेऊन त्या-त्या वर्गातील मुलींसमोर बैठका मारायला लावल्या.

Chimur
38 विद्यार्थीनींना 200 उठाबशांची शिक्षा
author img

By

Published : Feb 22, 2020, 4:58 PM IST

चंद्रपूर - चिमूर येथील अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकेने तब्बल 38 मुलींना 200 उठा-बशा मारण्याची शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या शिक्षेमुळे मुलींच्या पायांना सूज आली आहे, तसेच त्यांना चालतानाही त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरानंतर या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दुशीला मेश्रामनी, असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे.

पायाचा आवाज केला म्हणून 38 विद्यार्थीनींना 200 उठाबश्यांची शिक्षा

याबाबत अधिक माहिती अशी की, चिमूर येथील निवासी शाळेत 6 ते 10 वी पर्यंत 195 मुली शिक्षण घेत आहेत. दरम्यान, 18 फेब्रुवारीला शाळा सुरू होण्यापूर्वी 11 च्या दरम्यान प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत झाल्यानतंर मेडीटेशन दरम्यान 10 वीच्या मुली प्रात्याक्षिकच्या वह्या आनण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील वर्गात गेल्या. त्यावेळी कार्यालयासमोरुन जाताना पायाचा जोरात आवाज का करता, असे म्हणून मुख्याध्यापिका रागावल्या. त्यानंतर 38 मुलींना बोलावून त्यांना कान धरून उठ्याबशा काढण्यास सांगितले. त्यांच्याकडून वर्ग बंद करून उठयाबशा काढून घेतल्या.

तसेच मुख्याध्यापिकेने तुमचे प्रात्याक्षिक घेणार नाही. तुम्हाला शुन्य मार्क देईन, असे मुलींना सांगितले. तर एवढ्यावरच न थांबता प्रत्येक वर्ग खोल्यात नेऊन त्या-त्या वर्गातील मुलींसमोर बैठका मारायला लावल्या. त्यावेळी मुली रडत असतानाही मुख्याध्यापिका शांत झाल्या नाहीत. तर बैठका मारताना मुली थांबल्या की, पुन्हा एकपासून मोजण्यास सुरुवात करत होत्या.

दुसऱ्या दिवशी चालताना मुलींना त्रास व्हायला लागला. त्यामुळे प्रभारी वसतिगृह अधीक्षक प्रिती जामगडे यांनी त्या विद्यार्थिनींना रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र, रुग्णालय बंद असल्यामुळे मुली रुग्णालायात गेल्या नाहीत. त्यामुळे 6 मुलींना जास्त त्रास होऊ लागला. त्यानंतर 21 फेब्रुवारीला रिक्षातून या मुलींना जामगडेंनी महिला रक्षकासोबत उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यावेळी डॉ. गेडाम यांनी तपासणी केली असता, विद्यार्थीनींनी ही माहिती दिली. त्यावेळे डॉक्टरांनी सदर घटनेची पोलीस विभाग आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.